घर इतर *शिरुर तालुक्यात सापडला कोरोणाचा अजून एक रुग्ण*

*शिरुर तालुक्यात सापडला कोरोणाचा अजून एक रुग्ण*

20
0
शिरूर/टाकळी हाजी म्हसे बुद्रुक  येथे आठ दिवसांपूर्वी मुंबईतील पवई येथून आलेल्या कुटुंबापैकी एकाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. म्हसे बुद्रुक गाव टाकळी हाजी ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने या भागात खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत.
म्हसे बुद्रुक येथे 12मे रोजी पवई (मुंबई) येथे बॅंकेत काम करणारा एक कर्मचारी आपल्या आठ जणांच्या कुटुंबासह आला होता. म्हसे बुद्रुक येथील गोसावी मळा येथे या सर्वांना टाकळी हाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. या आठ जणांपैकी चाळीस वर्षे पुरुषाला करोना संसर्गाचे लक्षणे दिसू लागल्याने त्यांना औंध पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर काल अहवाल करोना पॉझिटिव्ह आला.
        म्हसे बुद्रुक गाव सील करण्यात आले असून या नागरिकांच्या कोणी संपर्कात आलेत का? याची तपासणी टाकळी हाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड करीत असल्याची माहिती आदर्श सरपंच दामुअण्णा घोडे यांनी दिली.
       तद्नंतर सर्वेक्षण व फवारणी करून प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पी. आय. शिरूर खानापुरे साहेब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी १६ जणांची निवड करून सर्वेक्षण करण्यात आले. गटविकास अधिकारी ढवळे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, आदर्श सरपंच दामू शेठ घोडे, ग्रा. पं. सदस्य काळूराम पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
12 + 4 =