घर पुणे जिल्हा वळती येथे दहा वर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू

वळती येथे दहा वर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू

22
0

निरगुडसर :

वळती तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत असलेल्या नरहरी नामदेव भोर त्यांच्या मालकीच्या असलेल्या शेततळ्यात वळती येथे वास्तव्यास असलेल्या सोहम गणेश गरकर या दहा वर्षिय मुलाचा तळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोहम हा आपल्या भावासह सोमवार दिनांक २५ रोजी सकाळी तळ्यावर अंघोळ करायला गेले होते. सोहम पाण्यात उतरल्यावर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत तळ्याचे मालक नरहरी भोर यांना समजल्यावर त्यांनी गणेशच्या घरचे भगवान गीते यांना फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली सर्वांनी घटनास्थळी जात पोलीस पाटील व ग्रामस्थांनी सोहमला बाहेर काढले असता तो काहीही हालचाल करत नसल्याने त्याला मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मयत झाला असल्याचे सांगितले याबाबत भगवान गीते यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कदम करत आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
12 ⁄ 4 =