घर पुणे जिल्हा भयानक! 3 वर्षांच्या लेकीला कंबरेला बांधून आईनं पुलावरून घेतली नदीत उडी

भयानक! 3 वर्षांच्या लेकीला कंबरेला बांधून आईनं पुलावरून घेतली नदीत उडी

22
0
हवेली :
राज्यात कोरोमानं थैमान घातलं आहे. नागरिकांमध्ये सध्या मोठी भीती पसरली असताना पुणे जिल्ह्यात एक भयानक घटना समोर आली आहे.पुणे नगर महामार्गालगत शिरुर हवेली तालुक्याला जोडणाऱ्या  भीमा नदीवरील पुलावरून एका महिलेने लहान मुलीसह नदीपात्रात उडी मारल्याने बुडून मृत्यू झाला. फायर ब्रिगेड व स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
   शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीवरून  भीमा नदीवरील पुलावरून सपना मधुकर कसबे (रा. सणसवाडी शिरूर, वय अंदाजे २५ वर्षे) हिने आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलीला आपल्या कंबरेला ओढणीने बांधून दुपारी 3.30 च्या आसपास पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.  सदर महिलेने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे तपास करत आहेत.
      या मायलेकिंचे मृतदेह पाण्यात चार वाजल्यापासून स्थानिक तरुण व पुणे महानरपालिकेच्या फायर ब्रिगेड चे जवान शोधत होते. अखेर सायंकाळी 6.30 वाजता दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आला. यात अभिषेक गोने, चेतन खमसे, विशाल घोडे, किशोर काळभोर, पंकज माळी, प्रसाद जिवडे, ओम पाटील यांच्यासह सोनू भोकरे , बाबू भोकरे, भाऊसाहेब अजगर, सोमनाथ अजगर आदी स्थानिक तरुणांनी स्वतःच्या बोटीसह शोध कार्यात सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
10 × 22 =