घर पुणे जिल्हा धोलवड मधील “त्या” व्यक्तीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

धोलवड मधील “त्या” व्यक्तीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

8
0
ओतूूूर :
मुंबईहून आपल्या कुटूंबीयांना गावी सोडण्यासाठी आलेल्या पती पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोलवड ( ता.जुन्नर ) गावी सोडलेल्या कुटूंबातील आई व बहिण या दोघींचा अहवाल दि.२३ रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला तर याच कुटूंबातील एका व्यक्तीचा अहवाल येणं बाकी होतं रविवारी दि.२४ रोजी “त्या” व्यक्तीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असुन धोलवड गावातील एकाच कुटूंबातील रूग्णांची संख्या आता पाच झाली आहे.
जुन्नरचे तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी धोलवड गाव आणि परिसर कंटेनमेंट झोन म्हणुन जाहिर केला आहे.
मुंबईहून धोलवड ता.जुन्नर येथेे एका कुटूंबातील सहा व्यक्ती गावी आले होते.कुटूंबातील आई,वडील, बहिण व मुलगी ह्या चार व्यक्तींना त्यांच्या मुलाने आपल्या गावी सोडून पती पत्नी परत मुंबईत गेले.मुंबईला गेल्यावर दोघेही आजारी पडले,आजारी असल्याने त्यांची मुंबईत वैद्यकिय तपासणी केल्यावर त्या दोन्ही व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
मुंबई येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या कुटूंबातील धोलवडला आलेल्या व्यक्तींनाही त्रास होवू लागल्याने त्यांना पुणे येथे तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते.
मुंबईहून धोलवडला आलेल्या त्या रूग्णाच्या आई व बहिणीचा कोरोना अहवाल दि.२३ रोजी पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या दहा वर्षीय मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर वडीलांचा अहवाल यणं बाकी होतं,दरम्यान रविवारी दि.२४ रोजी तीसऱ्याही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान दोन रूग्णांवर मुंबई येथे तर तीन रूग्णांवर पुणे येथे उपचार सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील धोलवड ( जांभळपट ) येथील एक कुटूंब मुंंबई येथून आई,वडील,पती पत्नी,बहिण व मुलीसह एकूण सहा व्यक्ती शुक्रवारी दि.१५ मे रोजी धोलवड गावी आले होते.चौघांना गावी सोडून पती पत्नी यांनी पुन्हा रविवारी दि.१७ रोजी मुंबई गाठली दरम्यान मुंबईत पोहचल्यावर या पती पत्नीला कोरोनाची लक्षणे दिसून त्रास होवू लागल्याने दोन्ही व्यक्तींंची मुंबई येथे कोरोना तपासणी केली.वैद्यकिय तपासणी दरम्यान दोघा पती पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.,
रूग्णाचे कुटूंंबातील गावी आलेल्या चारही व्यक्तींना प्रशासनाने धोलवड ( ता. जुन्नर ) येथे होम क्वारंटाइन केले होते.दरम्यान त्या व्यक्तींंनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांना वैद्यकिय तपासणी करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले.तपासणी दरम्यान यांच्या कुटूंबातील आई आणि बहिण व वडीलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले.
दरम्यान शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
    

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
6 ⁄ 2 =