घर नगर जिल्हा आणखी ०७ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव

आणखी ०७ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव

3
0

अहमदनगर:

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०७ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात एका रुग्णाचा १० दिवसांनंतरचा  रिपीट अहवाल पॉझिटिव आला आहे. तर अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे आलेल्या घाटकोपर येथील व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव आला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधीत व्यक्तींची संख्या आता ८० झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 33 वर्षीय पुरुष, अकोले तालुक्यातील ढोकरी येथील 35 वर्षीय पुरुष, नगर तालुक्यातील वाकोडी येथील 43 वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.

याशिवाय सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधित व्यक्तीचा दहा दिवसानंतरचा स्त्राव चाचणी अहवालही पॉझिटिव आला आहे. घाटकोपर येथून लिंगदेव (अकोले) येथे आलेल्या एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्याची पुन्हा येथे चाचणी केली असता तो बाधित असल्याचे आढळून आले आहे.

वडाळा महादेव येथे बाधित आढळून आलेली व्यक्ती ही काल बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहे. इतर बाधित व्यक्ती या त्यांना आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. ते अहवाल पॉझिटिव आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
23 + 3 =