घर नगर जिल्हा इतर अकोले तालुक्यात ढोकरी येथे कोरोनाचा रुग्ण आढळला

अकोले तालुक्यात ढोकरी येथे कोरोनाचा रुग्ण आढळला

प्रशासनाची धावपळ; मुंबई- पुणे भागातील लोकांची घुसखोरी

543
0

अकोले : अकोले तालुक्यातील ढोकरी येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे गेल्या दोन महिन्यापासून अकोले तालुक्यात  एकही रुग्ण आढळला नाही तर प्रशासनाने यासाठी मोठी मेहनत घेतली असली तरी दोन दिवसांपूर्वी या परिसरातील लिंगदेव येथे घाटकोपर येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले असले तरी आज पुन्हा एकदा तालुक्यातील प्रवरा परिसरातील ढोकरी येथे मुंबईहून आलेल्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे अकोले तालुक्यात आता दोन रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाची आता धावपळ उडाली असून गेल्या चौदा तारखेपासून काहीप्रमाणात दुकाने सुरू केली मात्र कोरोनाचे रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाला पुन्हा एकदा अकोले तालुका लॉक करण्याची वेळ येणार आहे दिवसेंदिवस देवठाण, डोंगरगाव, पिंपळगाव, बदगी, राजूर, बारी याठिकाणी पोलिस यंत्रणेने नाकेबंदी केली असली तरी या वाहनांची कसून चौकशी केली जात नाही याअगोदर देखील दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांचे पथक या चेक नाका परिसरात भेट देऊन गेले त्या वेळी अनेक चेक पोस्टवर सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी दिसून आले नाही त्यांच्यावर मात्र जिल्हा पोलीस प्रमुख यांनी कारवाईचे आदेश दिले असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते आता मात्र अकोले तालुक्यातील दोन महिन्यात अधिकारी वर्गाने लोकडाऊन काळामध्ये विशेष दखल घेऊन या अधिकारी वर्गाचे सर्व स्तरातून कौतुक होत असले तरी गेल्या आठ दिवस अकोले तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे व दुकाने चालू केल्यामुळे आता मात्र कोरोनाचा दुसरा रुग्ण ढोकरी येथे आढळून आल्यामुळे आता मुंबई-पुणे-नाशिक यासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्ये या कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन व ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली आहे मात्र अकोल्याचे लोकप्रतिनिधी लहामटे यांनी सर्व चेकपोस्टवर कडक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस व महसूल यंत्रणेला दिले असले तरी केंद्र व राज्य पातळीवरून लोकडाऊन बाबत काही प्रमाणात शिथिलता करण्यात आल्यामुळे अधिकारीवर्ग व पोलीस यंत्रणा  कारवाई करताना दिसून येत नाही त्यामुळे मुंबई-पुणे-नाशिक यासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना चेकपोस्टवर कसून चौकशी केली जात नाही ही अशी माहिती संबंधित गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे आता प्रवरा परिसरात देखील  अनेक दिवसांपासून शांत असलेला अकोलेे तालुका दुसरा रुग्ण आल्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरचे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी तातडीने चेक पोस्टवर  कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे. शहरातून लोक ग्रामीण भागाकडे येऊ लागल्याने आता नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होत असून याठिकाणी परवानगी देताना पन्नास लोकांना विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी असली तरी अनेक ठिकाणी पाचशे ते सहाशे लोक विवाह होण्यासाठी एकत्र येतात तसेच दशक्रिया विधी व सध्या आंबरस या सणासाठी देखील काही भागांमध्ये पाहुणे आजही दिसून येते त्यामुळे स्थानिक पातळीवर समित्या निर्माण केले असले तरी या समितीमध्ये असलेले अनेक लोक आपल्या ओळखीच्या माणसांवर मेहरबानी करून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे विचारणा केली जात नाही तर ज्या कमिटीमध्ये सरपंच व समितीचे सदस्य आहे ते मात्र मागील राजकीय राग मनात धरून आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या समितीवर असणाऱ्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींवर प्रशासनाने देखील  कडक करवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
1 × 13 =