घर नगर जिल्हा श्रीगोंदा वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला जबर मारहाण

वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला जबर मारहाण

55
0

श्रीगोंदा प्रतिनिधी: श्रीगोंदा शहरातील पत्रकार शिवाजी साळुंके हे वार्तांकन करण्यासाठी श्रीगोंदा परिसरातील औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर गेले असता त्यांना ५ ते ६ जणांनी मिळून जमावबंदीचा कायदा मोडून प्राणघातक हल्ला करून जखमी केले आहे त्याचेवर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर पत्रकार साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जबर मारहाणीसह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी आहे की पत्रकार शिवाजी साळुंके यांना परिसरातील शेतकऱ्याकडून माहिती मिळाली की कुकडी वितरिका क्रमांक ११ वर काही इसमांनी अनधिकृतपणे वितारिकेला भगदाड पाडून पाणी चोरून चालवले आहे. त्यामुळे ते सकाळी ९ वाजेच्या सुमारास वितारिकेवर वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शशिकांत माने जे जेसीबी यंत्राच्या साह्याने भगदाड बुजविण्यासाठी आले होते वितारिकेला भगदाड पाडलेले पाहून फोटो काढण्यासाठी साळुंखे यांनी मोबाईल काढला असता आरोपी आबा सखाराम औटी,दशरथ आण्णा औटी,ज्ञानदेव औटी, भरत औटी, आबा औटी या पाच जणांनी उपअभियंता माने यांच्या समक्ष त्यांची मोटारसायकल वितारिकेत ढकलून देऊन शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना वितारिकेच्या पाण्यात ढकलून दिले.जखमी अवस्थेत त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीने श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याना सांगितला त्यावर जाधव यांनी आगोदर उपचार घ्या असे सांगितले त्यानुसार पत्रकार साळुंखे यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन श्रीगोंदा ग्रामीण रुग्नालयात उपचार घेतले घडलेल्या सर्व प्रकारावरून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि भारतीय दंड विधान कलम ३०७ नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करत आहेत
काही वेळात गुन्हा दाखल करतील ,मात्र कुणीच आले नाही – हेमंत धुमाळ
कुकडीचे वितरिका क्र ११ काही लोकांनी फोडली आहे व त्या ठिकाणी पत्रकार साळुंखे याना मारहाण झाली आहे याबाबत अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि आमची वितरिका फोडली असेल तर मी आमच्या अधिकाऱ्यांना तात्काळ गुन्हा दाखल करायला येतील असे त्यांनी सांगितले मात्र वास्तविक पाहता कुकडीचे अधिकाराची अथवा कर्मचारी वितरिका फोडल्या प्रकरणी कोणीही गुन्हा दाखल करण्यास आले नाही
समज देताच सर्वजण निघून गेले – शशिकांत माने
कुकडी वितरिका क्र ११ वर चारी फोडल्याची माहिती मिळताच आम्ही आमच्या सहकाऱया सोबत जेसीबी यंत्र घेऊन त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी पत्रकार साळुंखे याना मारहाण चालू होती मी पुढे जाऊन त्यांची सोडवासोडव केली अशी माहिती शाखा अभियंता माने यांनी पत्रकारांना दिली आहे–

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
11 + 24 =