घर नगर जिल्हा श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह……

श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह……

10
0

 

श्रीगोंदा प्रतिनिधी :

बारामती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आले असल्याची माहिती दि.२९ मार्च रोजी समोर आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नगर येथे पाठविल्या नंतर आज दि.२ एप्रिल रोजी त्या तीन जणांचे कोरोना तपासणी अहवाल मिळाले असून तिघेही कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
२० मार्च रोजी श्रीगोंदा तालुक्यातील या तीनही व्यक्ती शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बारामती येथील ‘या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती दि.२९ मार्च रोजी समोर आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नगर येथील
जिल्हा रुग्णालयात पाठविल्याने श्रीगोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. त्या तिनही रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल आज दि.२ एप्रिल रोजी मिळाले असून तिघेही कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. अहवाल जरी निगेटिव्ह आला असला तरी आता बेफिकीरपणा सोडत नागरिकांनी आपली स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी केले.

बारामतीच्या कोरोना बधिताशी संपर्क आल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील तीन जणांच्या सोमवारी केलेल्या तपासणी चा अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट करण्यात आले गुरुवारी हा अहवाल आला
या तिघांचा अहवाल काय येतो याकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते
दरम्यान तालुक्यातील 1120 जणांचे होम कोरोंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासन आणि आरोग्य खात्याचे लक्ष आहे असे आरोग्याधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी सांगितले

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
3 × 3 =