घर नगर जिल्हा श्रीगोंदा श्रीगोंदयात खळबळ; कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात 3 जण आल्याचे वृत्त

श्रीगोंदयात खळबळ; कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात 3 जण आल्याचे वृत्त

605
0

श्रीगोंदा । अंकुश तुपे :-बारामती ला कोरोना व्हायरस बधितला श्रीगोंदा तालुक्यातील 3 जणांचा संपर्क आल्याचे वृत्त येथे पसरताच एकच खळबळ उडाली या 3 जणांना नगर येथील सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठवल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी जनप्रवास प्रतिनिधीशी बोलताना सांगितले त्यांचा अहवाल आल्यावरच इतर कोणाचा संपर्क आला का याचा शोध घेतला जाणार आहे,दरम्यान ते 3 जण कोण याची उलट सुलट चर्चा दिवसभर होत होती,ते समारंभात गेले होते की शेती औजार साठी गेले होते याचीच चर्चा होती .कोरोना व्हायरस प्रतिबंध बाबत शासनाने गुरुवारी 19 मार्च पासून 31 मार्च पर्यन्त अत्यावश्यक सेवा वगळता बंद जाहीर केला.पुढे 22 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यु यशस्वीझाला आणि 24 पासून जनता दवाखान्यात,मेडिकल,किराणा आणण्यासाठी चाललो म्हणत रस्त्यावर उतरले पोलिसांनी समजावून सांगितले,रोगाचे गांभीर्य लक्षात आणून दिले पण लोक गंमत म्हणून बाहेर पडताच राहिले शेवटी पोलिसांनी काठी उगारली,तहसीलदार हातात काठी घेऊन मारू लागले,पेट्रोलपंप बंद करून पाहिले ,मंडई उठविण्यात आली, शहरात तर ही परिस्थिती ग्रामीण भागातील लोकही फिरू लागले यात दमछाक झाली ती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची ते शहरात,वाडीवस्ती वर फिरले,स्वतः अनौसमेंट केली
आज मितीस कोरोना बारामती,नगरमध्ये म्हणजेच श्रीगोंदयाच्या हद्दीवर उभा आहे.
गेल्या 13,14 दिवसात पुढारी मंडळी आवाहनासाठीच फिरले पण पोलीसनिरीक्षक दौलत जाधव,तहसीलदार महेंद्र माळी,आरोग्याधिकारी नितीन खामकर यांनी स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता फिरत असताना लोकांमधील बेफिकिरी लॉक डाउन काळात घरात बसणार्यासाठी धोकादायक तर ठरणारनाही ना? हाच सवाल घरी बसणारे विचारत आहेत.
त्यातच भाजीपाला,घेऊन जाण्यासाठी परवानगी असल्याने त्याचा गैरवापर होत आहे,जिल्हा बंदी असताना न्हावरा,अजनुज,पेडगाव,जलालपूर, भिंगाण,विसापूर,म्हसनेफाटा,येथील शॉर्ट कटने प्रवेश करत आहेत,पुण्या,मुंबईतुन सुटलेला माणसांचा लोंढा जिल्ह्याच्या सीमेवरच्या श्रीगोंदा असल्याने थांबला,शहरातील कुणाचा भाऊ,मुलगा,जावई,यांनी श्रीगोंदयाला पसंती दिली पण आरोग्य खात्याने सर्व्हे करताना माहिती दडवली या सर्व बाबी पोलिस निरीक्षक दौलत जाधव,आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या नियोजनात अडथळे ठरत आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
25 − 1 =