घर नगर जिल्हा कोपरगाव पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा स्नेहलता कोल्हे यांनी केला निषेध

पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा स्नेहलता कोल्हे यांनी केला निषेध

127
0

कोपरगाव प्रतिनिधी दि. ३०: सध्या देशभरात करोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात बसलेल्या जनतेला करोना संदर्भातील माहीती पोहचवून योग्य प्रबोधन करण्याचे काम पत्रकार बांधव करीत आहेत.जितके पोलीस ,डॉक्टर मेहनत घेत आहेत त्याच पटीत पत्रकार बांधव समाजातील सध्याची परिस्थितीची माहिती जनमाणसा पर्यंत पोहचवित आहेत. चोख कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणे आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला पत्रकाराने जाब विचारला म्हणुन बेदम मारणे योग्य नाही. पत्रकाराला मारहान केलेल्या या घटनेचा आपण निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
विनाकारण नागरीकांना का मारताय असा जाब पोलीसांना
हिंगोली येथील कन्हैय्या खंडेलवाल या एका वृत्तवाहीणीच्या पत्रकाराने विचारला असता वाहतुक शाखेच्या पोलीस निरीक्षकाने पत्रकार खंडेलवाल यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकी देत जबर मारहान केल्याची घटना हि़गोली येथे घडली.या मारहानीत पत्रकार खंडेलवाल गंभीर झाले असुन त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेचा कोल्हे यांनी तिवृ शब्दात निषेध व्यक्त केला. पोलीस व पत्रकार या दोघांची भुमिका जनतेच्या रक्षणाची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची आहे. सध्या जगासह देशावर करोनाचे मोठे संकट आले आहे त्याचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकांनी आपलं कर्तव्य पार पाडावे. द्वेषाची भुमीका कोणीही बजावू नये. अशी विनंती कोल्हे यांनी सर्वांना केली आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
30 + 4 =