घर नगर जिल्हा श्रीगोंदा श्रीगोंदा: नागरिकांनी शासनाचे आदेश पाळावेत: तहसीलदार महेंद्र माळी

श्रीगोंदा: नागरिकांनी शासनाचे आदेश पाळावेत: तहसीलदार महेंद्र माळी

129
0

श्रीगोंदा(प्रतिनिधी)कोरोना व्हायरस प्रतिबंध साठी नाजूक काळ सुरू झाला असून नागरिकांनी शासनाने जाहीर केलेले लाँकडाऊन पाळावा जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्याचे आम्ही नियोजन करत असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन
तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे ते म्हणाले जीवनावश्यक वस्तू बाबत श्रीगोंदा तालुक्यात सर्व नागरिकांना घरपोच सुविधा उपलब्ध होतील यासाठी पूर्ण नियोजन केलेले आहे.
पेट्रोल- सकाळी ५ ते ९ ,डिझेल- सकाळी ५ ते १२ पर्यंत सर्वांना उपलब्ध करुन दिले आहे.(आवश्यक आहे त्यांनीच पेट्रोलपंप वर यावे), अत्यावश्यक सेवा मेडिकल, हॉस्पिटल, किराणा ,भाजीपाला ,दुधाचे टँकर यांच्या वाहनांना प्राधान्य देण्यात आले आहे.
किराणा दुकानदार नागरिकांना घरपोच सेवा देण्यास तयार आहेत.त्याबाबत संबंधित सर्व किराणा दुकानदार यांना सूचना दिलेल्या आहेत.
भाजीपाला:
घरपोच देण्यासाठी सेवा देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी घरपोच सेवा देणारे शेतकरी यांचा एक गट तयार करण्यात आला आहे.त्यामुळे शक्यतो घराबाहेर जाऊन भाजीपाला घेण्यासाठी येऊ नये.
मेडिकल आणि हॉस्पिटल:
ही सुविधा आपणास २४ तास उपलब्ध करुन दिली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील सर्व हॉस्पिटल आणि सर्व खाजगी डॉक्टर यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १६० बेड उपलब्ध केलेले आहेत.
गॅस सिलेंडर:
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गॅस वितरक यांना घरपोच गॅस सिलेंडर देणेबाबत सक्त सूचना देण्यात आली आहे.
फळे,भाजीपाला: यांची नेआण तालुक्यात कुठेही करणेसाठी काही अडचण नाही.फक्त इतर जिल्ह्यात किंवा राज्यात पाठविणेसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे नमूद केले आहे.
श्री सरोदे (ARTO)- 08999746122 .
श्री धूम (aimv)- 08830306068 .
दूध देखील घरपोच उपलब्ध होईल याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
याविषयी (तहसीलदार श्रीगोंदा) महेंद्र माळी यांनी तालुक्यातील लोकांना खबरदारी म्हणून,घरी राहण्याचे आवाहन केले आहे.अन्यथा वेळप्रसंगी कठोर भूमिका घेत ,साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि IPC 188 प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश स्थनिक प्रशासनास दिले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


जिल्हा बंदी असताना श्रीगोंदा बसस्थानक मागील भिंगान रस्त्यावरून परप्रांतियांनी खचाखच भरलेल आईस्क्रीमचेे वाहन भरधाव वेगाने गेल्याने परिसरात खळबळ उडाली या रस्त्यावरील एका किराणा दुकानात पाण्याच्या बाटल्या देखील घेतल्या प्रस्तुत प्रतिनिधीने या लोकांना पाहिल्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना सांगितल्यावर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी त्वरित पोलीस गाडी पाठवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला सदर गाडी कोल्हापूर येथून आल्याचे समजते.जिल्हा बंदी असताना लोक आता रस्ते ऐवजी आडमार्गाने प्रवेश करू लागल्याने स्थानिकांत चिंता व्यक्त केली जात आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
25 − 19 =