घर महाराष्ट्र हिंदूविरोधी वक्तव्य; वारिस पठाण यांच्यावर ओवीसींनी केली कारवाई

हिंदूविरोधी वक्तव्य; वारिस पठाण यांच्यावर ओवीसींनी केली कारवाई

31
0

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावरवर कारवाई करण्यात आली आहे. एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांच्यावर कारवाई केली आहे. वारिस पठाण यांना माध्यमांवर बोलण्याची बंद घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादचे खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितले.  “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तो पर्यंत वारिस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास वारिस पठाण यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचं स्पष्टीकरण वारिस पठाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलं.‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे. असं वारिस पठाण सकाळी प्रसारमाध्यमांना म्हणाले होते.

काय म्हणाले होते वारिस पठाण?
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

मनसेचा वारिस पठाण यांच्यावर निशाना –
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. “ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एक अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या वक्तव्यात मग्रुरी आहे. माज आहे. वारिस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून म्हणतात, आपण “१५ कोटी आहोत, पण १०० ला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट!” ‘१००ला भारी’ म्हणजे नेमके कोणाला हे १५ भारी पडणार? हिंदूंनाच ना! हिंदुस्थानात राहून हिंदूंनाच धमकी देतोय हा उपटसुंभ!

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
24 ⁄ 8 =