घर नगर जिल्हा कर्जत कर्जत : मृत्युस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा !

कर्जत : मृत्युस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा !

अन्यथा मृत महिलेचा दशक्रिया विधी कर्जत पोलीस ठाण्यासमोर करणार

2292
0
कर्जत – कर्जत शहरातील काकडे हॉस्पिटल मध्ये ३१ जानेवारी रोजी प्रसूती दरम्यान केलेल्या शस्त्रक्रिया मुळे २० वर्षीय पूजा वैभव ढगे राहणार पेडगाव तालुका श्रीगोंदा हिचा शास्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरांनी  हलगर्जी पणा केल्यामुळे झालेल्या रक्तस्रावात पूजा यांचा ११ फेब्रुवारी रोजी पुढील उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे निवेदन मृत महिलेचा दीर दिलीप पोपट ढगे राहणार पेडगाव यांनी कर्जत पोलीसांना दिलेल्या निवेदनात केला आहे. पूजा हिच्या मृत्यूस कर्जत येथील डॉ विलास काकडे आणि नगर येथील न्यूक्लियस हॉस्पिटल चे डॉ गोपाळ बहुरूपी हे सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. या दोन डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पूजा हिचा मृत्यू झाला असल्याची तक्रार कर्जत पोलिसांकडे १५ फेब्रुवारी रोजी केली होती. मात्र तक्रारीस पाच दिवस उलटूनही पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला नसल्याने पूजा वैभव ढगे हिचा २० फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात येणारा दशक्रिया विधी हा कर्जत पोलीस ठाण्यासमोर करणार असले बाबतचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
     मृत पूजा ढगे यांच्या कुटुंबीयांनी तिचा दशक्रिया विधी थेट कर्जत पोलीस ठाण्यांसमोरच करणार असल्याच्या इशाऱ्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.वैद्यकीय क्षेत्रात या घटने बाबत चर्चा झडू लागल्या आहेत मृत पूजा आणि वैभव यांचा विवाह हा मोठ्या संघर्षा नंतर पार पडला होता. चार वर्षाच्या प्रेमाला मोठ्या विरोधानंतर दोन्ही कुटुंबीयांनी मान्यता दिली होती मागील वर्षी पूजा व वैभव लग्नाच्या बंधनात अडकले होते श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे दिलेल्या पूजा ला बाळंतपणासाठी कर्जत तालुक्यातील धालवडी या तिच्या  माहेरी आणले असल्याने बाळंतपणासाठी कर्जत येथील डॉ काकडे यांच्या दवाखान्यात दाखल केले होते. मात्र पहिल्या प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जी पणा केल्याने पूजा ला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप पूजा ढगे हिच्या कुटुंबीयांनी निवेदनात केला असून तिच्या मृत्युस कारणीभूत  असलेल्या कर्जतचे डॉ विलास काकडे व नगर येथील डॉ गोपाळ बहुरूपी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा २० फेब्रुवारी रोजी पूजा वैभव ढगे हीचा करण्यात येणारा दशक्रिया विधी हा कर्जत पोलीस ठाण्यासमोर करणार असल्याचा इशारा ढगे कुटुंबीयांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
16 ⁄ 8 =