घर महाराष्ट्र सरकार कोसळल्यानंतर भाजपा सरकार स्थापन करणार नाही, मध्यावधी अटळ !

सरकार कोसळल्यानंतर भाजपा सरकार स्थापन करणार नाही, मध्यावधी अटळ !

47
0

मुंबई : शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचा आणि जनतेच्या प्रेमाचा विश्वासघात केला असून हे महाआघाडीचे सरकार आपसातील मतभेदामुळे आपोआपच पडणार आहे त्यासाठी आम्ही काही कऱण्याची गरज नाही. मात्र हे सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार नाही. त्यामुळेच मध्यावधी निवडणुका अटळ आहेत. येणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये जनादेशाचा अनादर करणाऱ्या सर्व पक्षांना जनताच धडा शिकवेल आणि भाजपाचे सरकार पुन्हा येईल असा विश्वास भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
दुसऱ्यांदा भाजपाचे राज्याचे अध्यक्षपद स्विकारल्या नंतर आज सकाळी ते प्रथमच प्रदेश कार्यालयात आले होते. त्यावेळी माधव भांडारे, केशव उपाध्ये, गणेश हाके, किरीट सोमय्या आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की काल नवी मुंबई येथे भाजपाचे दोन दिवसांचे प्रदेश अधिवेशन पार पडले. नव्या अध्यक्षांची निवड भाजपामध्ये दर तीन वर्षांनी गाव स्तरापासून ते देशस्तरापर्यंत
होते. त्या प्रक्रियेतील भाग म्हणजे हे अधिवेशन होते तिथे पाच हजार सातशे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन ठराव आम्ही केले त्यातील पहिला ठराव हा शिवसेनेने केलेल्या विश्वासघाताचा व जनतेच्या प्रेमाचा अनादर केल्याबद्दलचा होता. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच निकालानंतर आम्ही त्यांच्या समवेत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होतो. जर भाजपाची साथ नसती तर शिवसेनेला 54 जागा विधानसभेत मिळाल्याच नसल्या असे सांगून दादा म्हणाले की राष्ट्रवादी व काँग्रेसला विरोधी बाजूलाच बसम्याचा जनादेश मिळालेला होता. मात्र त्यांनी भाजपाची सत्ता चोरली आणि त्यांना शिवसेनेने साथ दिली. ते सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेबरोबर पुन्हा सरकारमध्ये जाण्याचा प्रश्नच संपला. यापुढे महाआघाडीचे सरकार अंतरविरोधाने कोसळेल तेंव्हा भाजपा सरकारमध्ये जाईल असे कोणी समजू नये आम्ही नकार दिल्यानंतर विधानसभा भंग होईल आणि मध्यावधी निवडणुकीला समारे जावे लागेल. सचीन सावंत आणि संजय राऊत यांनी देवेन्द्र फडणवीसांच्या विधानांवर तिरकस टिप्पण्या केल्या आहेत राऊत म्हणाले की पाच वर्षे आमचे सरकार चालेल मध्यावधी व्हाव्याच असतील तर आधी फडणवीसांनी पाच किलो वजन कमी करून दाखवावे या विधानाचा समाचार घेताना दादा म्हणाले की राऊतांचे विधान बालीश आहे. देवेनद्रजींनी आव्हान दिले की हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जा , यात राजकीय दमदारपणा आहे त्यावर तुम्ही पाच किलो वजन कमी करून दाखवा या वाक्याला काय अर्थ आहे. अजीतदादा व फडणवीसांच्या शपथविधी संदर्भात सचीन सावंत म्हणाले की फडणवीसांना अजीत पवारांनी मामू बनवले त्यावर पाटील म्हणाले की सावंतांनी आमची चिंता करू नये. जीवनात काही घटना घडतात त्यातून धडा घेऊन आपण पुढे जातो यापुढे केवळ मध्यावधी निवडणुका हाच पर्याय असेल. त्यादृष्टीने एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कऱण्याचा ठराव कालच्या अधिवेशनात आम्ही केला आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी 400 तहसील कार्यालयांवर भाजपाचे कार्यकर्ते दिवसभर धरणे धरतील आणि जनतेला शेतकऱ्यांच्या फसवणुकी संदर्भात तसे कायदा व सुव्यवस्थेचा जो बोजवारा आघाडी सरकारने उडवला आहे . त्या संदर्भात दिवसभर माहिती देतील जनप्रबोधन करतील . इंदुरीकर महाराजांनी महिलांच्या संदर्भात जे विधान केले ते त्यांनी करायला नको होते असे सांगून पाटील म्हणाले की मात्र त्या एका विधानामुळे त्या माणसाच्या इतक्या वर्षांच्या तपच्चर्येची राख मीडियाने केली. तसे व्हायला नको होते. इंदुरीकर महाराज महिन्याला 80 प्रवचने अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रवचनात जनतेला शहाणे कऱण्याचे व प्रबोधनाचे मोठे काम होत असते . त्या साऱ्या कामावर अशा एक वाक्याने बोळा
फिरवला जाऊ नये अशीही अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
29 + 3 =