घर ठळक बातम्या अंधेरीतील रोल्टा कंपनीला भीषण आग

अंधेरीतील रोल्टा कंपनीला भीषण आग

अग्निशमनच्या ८ गाड्या घटनास्थळी

28
0

अंधेरी पूर्वमधील सिप्झ एमआयडीमधील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ही आग लेवर ३ प्रकारची असल्याचे सुरुवातीला अग्निशमन दलाने सांगितले होते. मात्र, आता ही आग आणखीनच भडकली आहे. त्यामुळे अग्निशमनदल युद्धपातळीवर आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

थर्मल इमॅजीन कॅमेरॅच्या मदतीने आग नेमकी कुठे लागलीय याचा शोध घेऊन ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुपारीच्या १च्या सुमारास ही आग नियंत्रणात येईल असे वाटत होते. सध्या ही आग आणखीनच भडकत चालली आहे. सकाळी साडेअकरा वाजता शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ही इमारत संपूर्ण काचेची इमारत असल्याने यामध्ये हवा खेळती राहत नसल्याने प्रचंड धूर आणि आगीचे लोळ उठत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या इमारतीची वीज बंद करण्यात आली आहे. सुदैवानं या इमारतीत कोणताही कर्मचारी अडकलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
20 ⁄ 5 =