घर नगर जिल्हा पाथर्डी पाथर्डी : दोन नंबर वाल्याच्या सर्जिकल स्ट्रईकमुळे बाजारपेठेस नागरिकांची सुरक्षा धोक्यात !

पाथर्डी : दोन नंबर वाल्याच्या सर्जिकल स्ट्रईकमुळे बाजारपेठेस नागरिकांची सुरक्षा धोक्यात !

530
0

पाथर्डी : राजआश्रय लाभलेल्या अवैध धंद्याशी निगडीत असलेल्या तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्या मुळे शहरासह तालुक्यातील बाजारपेठ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षितता धोक्यात आली असून अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजाश्रय असल्याने नाईलाजास्व व्यापारी वर्गात व्यवसायांच्या उज्वल भविष्या साठी व्यवसाय स्थलांतरनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

पाथर्डी तालुक्यात बहुतेक राजकीय पक्षामध्ये चोरटी वाळू वाहतूक करणारे,गरीबांच्या जमिनीवर तसेच शासकीय भूखंडावर कब्जा करून इमारती उभे करून मोठे झालेले लॅन्ड माफिया,रेशन घोटाळे करणारे,अवैध सावकार,वेश्या व्यवसाय व मद्य विक्रीतून मोठे बक्कल पैसा कमावनारे हॉटेल चालक,खिसे कापू सह चोरी व दरोड्यांची गुन्हे दाखल असणारे दोन नंबर धंदया वाल्यांचा बड्या राजकीय नेत्या बरोबर असलेले खुलेआम उठणे बसणे दिवसेंदिवस वाढत असून राजाश्रय मिळाल्याने अनेक दोन नंबर वाले आपले धंदे वाढवण्यासाठी राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत.पाथर्डी शहरासह तालुक्यात शासकीय जमीन हडप करणे गोरगरिबांच्या जमिनी धाक दाखवून लुटणे तसेच आदिवासी लोकांना पैश्याचे आमिष दाखवून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर बसवून ती जमीन नोटरीवर विकत घेणे असे प्रकार सध्या दिवसाढवळ्या पाथर्डी शहरात व तालुक्यात सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापार पेठेतील व्यापारी मोठ्या संकटात सापडला असून राजाश्रय लाभलेल्या गुंडांची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. यास् आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरत असून. त्या गुंडांचा बंदोबस्त करण्याचे सोडून लोकप्रतिनिधी अश्या गुंडांचे कवच व पैशेवाले म्हणून त्यांना पक्षात आणून पदवी बहाल करताना दिसून येत आहेत. निवडणुकीत धमकावून मतदान करवून घेणे विरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला धमकावणे असे प्रकार निवडणुकीत होत असून त्यामुळे अशा गुंडांना राजकीय नेत्याकडून आश्रय देऊन खतपाणी घातले जात असल्याची ओरड तालुक्यातून ऐकायला मिळत आहे.यामुळे अनेक व्यापारी पेठेतील धंदे बंद करण्याच्या तयारीत असून याविरुद्ध आवाज उठवणाराना धमकावले जाते.मध्यंतरी पाथर्डीतील एका कार्यकर्त्याला किरकोळ कारणावरून एका लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी त्याच्या दुकानात घुसून मारहाण केली तसेच पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका पत्रकाराने दहा रुपयाचे नाणे न स्वीकारणाऱ्या लोकप्रतिनिधी समर्थक पंप चालकाच्या विरोधात बातमी लिहिली होती त्या लोकप्रतिनिधीच्या समर्थकांने पत्रकाराला देखील बघून घेऊ अशी धमकी दिली होती ती तसेच शेवगाव पाथर्डी मतदार संघातील पूर्व भागातील एका पत्रकाराने वाळू माफियांविरुद्ध बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर राजकीय क्षेत्रात पदाधिकारी असलेल्या त्या वाळू माफियाने पत्रकाराला देखील मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर अशा कित्येक घटना दिवसाढवळ्या घडत असून देखील राजकीय नेत्यांकडून त्यांना मोठ्याप्रमाणावर पाठबळ मिळत आहे.यास दोन नंबरवाल्यांना मिळालेला राजाश्रय कारणीभूत असून राजकारण सर्वसामान्य जनतेसाठी विकास कामे करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारीतून मलिदा लाटला जात आहे.सर्वसामान्य नागरिकांवर तसेच व्यापाऱ्यांवर धोक्याची तलवार टांगतान दिसत आहे.या सर्व बिकट परिस्थितीत कोणी तारणहार होण्यासाठी पुढाकार घेणार व या परिस्थितीचा बंदोबस्त करणार असे प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.पाथर्डी तालुक्याला एका दबंग पोलीस अधिकाऱ्याची गरज निर्माण झाली आहे असून जो चुकीच्या राजकीय पुढारी धोरण व दोन नंबर वाल्याचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी देखील याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे झाले आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
18 − 5 =