घर नगर जिल्हा कर्जत जेलमधून पळून जाणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले

कर्जत जेलमधून पळून जाणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले

39
0
अहमदनगर  कर्जत पोलीस ठाण्यातील जेलमधून फरार झालेल्या आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुडलिक भोरे व कर्जत पोलिसांनी गंगाधर लक्ष्‍मण जगताप या आरोपींना जेरबंद केले आहे.
ही आरोपी रविवारी (दि.९) रात्री साडेसातच्या सुमारास कर्जत पोलीस ठाण्यातून पळून गेले होते. उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्या फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.
कर्जत पोलीस ठाण्यातील जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले खूनप्रकरणातील आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, ( दोघे रा. जामखेड ), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, (जवळा जामखेड), गंगाधर लक्ष्‍मण जगताप (रा. महाळंगी ता. कर्जत) हे जेलच्या छतावरील प्लाऊड कटरच्या सहाय्याने कट करुन त्यानंतर कौल काढले आणि या चारही आरोपींनी पलायन केले होते. यामधील ज्ञानेश्वर कोल्हे जामखेड तालुक्यातील असून ह्या रिव्हल्वर आणि त्याची विक्री करणे यासह अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे तर अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत हे जामखेड येथील दोन्ही आरोपी मुंबईतील टरबूज व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होते. तर गंगाधर जगताप कर्जत तालुक्यातील आरोपी बलात्काराच्या खुन्याच्या गुन्ह्यांमध्ये होता.
हे सर्व आरोपी एकाच कस्टडीमध्ये ठेवले होते. जेलमधून चार आरोपी पळून गेले होते.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
24 ⁄ 8 =