घर पुणे जिल्हा इतर गायरान जागेत अतिक्रमण केल्याने पारगाव (शिंगवे)च्या सरपंचाचे पद रद्द

गायरान जागेत अतिक्रमण केल्याने पारगाव (शिंगवे)च्या सरपंचाचे पद रद्द

76
0

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पारगाव शिंगवे तर्फे अवसरी बुद्रुक या गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच बबन नामदेव ढोबळे यांनी शासकीय गायरान जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सरपंचपद व सदस्य पद रद्द झाले आहे.याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अपात्र ठरविले असल्याचा आदेश दिला आहे. तालुक्याच्या पुर्वभागातील दोन दिवसात पारगाव व पोंदेवाडी या राष्ट्रवादी च्या दोन महत्वाच्या गावांचे सरपंचाचे पद गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले पारगाव गावचे सरपंच बबन ढोबळे यांचे सरपंचपद व सदस्यपद जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे. तसा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी निकाल पत्रात दिला आहे.पारगाव  गावातील रहिवासी दिपक लक्ष्मण ढोबळे यांनी दि ६/२/२०१९ रोजी सरपंच बबन ढोबळे यांच्या विरोधात गायरान जागेत अतिक्रमण केले असल्याची  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती व तसे पुरावे अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले  जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी संबंधित तक्रारीची दखल घेऊन व पुरावे पाहून बबन ढोबळे यांचे सरपंचपद अपात्र ठरवले आहे.

२०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती ,नगरपालिका, या या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, पती-पत्नी, यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्यास त्यांना अपात्र ठरविण्यात यावे असे म्हटले आहे त्यानुसार गावचे सरपंच बबन ढोबळे यांचे एकत्र कुटुंब असताना त्यांच्या आईने  गट क्रमांक १०५५ या गायरान जागेत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज – ३)चे अन्वये सरपंच बबन ढोबळे यांचे पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.दरम्यान गेल्या दोन दिवसात आंबेगाव तालुक्यातील पूर्वभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पारगाव,व पोंदेवाडी या दोन महत्वाच्या गावांचे सरपंचाचे पद गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
22 ⁄ 11 =