घर महाराष्ट्र खेडकर यांच्या तमाशा फडावर जीवघेणा हल्ला; महिला कलावंतांची काढली छेड

खेडकर यांच्या तमाशा फडावर जीवघेणा हल्ला; महिला कलावंतांची काढली छेड

233
0

मागील तीन पिढ्यांपासून राज्यात तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाच्या फडावर नाशिक जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. साकूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. तमाशा फडातील महिला कलावंतांची छेड काढण्यात आली. इतर कलावंतांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशाच्या फडातील कलावंतांवर साकूर या गावी हल्ला करण्यात आला आहे. तमाशाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही लोकांनी कलावंतांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसंच कलावंतांच्या तोंडावर आणि डोक्यावर वार करण्यात आले. तर काही महिला कलावंतांची छेड काढून त्यांचा विनयभंग करण्यात आला. या घटनेची माहिती रघुवीर खेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे दिली.

Posted by Djabhijit Thorat on Thursday, 6 February 2020

आमच्या तीन पिढ्या तमाशाच्या माध्यमातून राज्यात प्रबोधनाचं काम करत आहेत. तमाशा कलावंतांना अशा प्रकारची वागणूक देऊ नये. हातावर पोट असलेल्या आमच्यासारख्या कलावंतांवर असे हल्ले होत असतील तर, आम्ही जगायचं कसं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही घटना निषेधार्ह आहे. आम्ही दाद मागायची कुणाकडे? सरकारने या घटनेची दखल घेऊन हे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही खेडकर यांनी केली आहे.

सार्वजनिक कार्यक्रमाची वेळ संपल्यानं तमाशा कलावंतांनी कार्यक्रम थांबवला. पण काही जणांना त्याचा राग आला. त्यांनी कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यास सांगितलं. तसंच दमदाटी करून त्यांना मारहाण केली, अशी माहिती समजते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी वैभव रमेश सहाणे, गणेश विठ्ठल सदर (दोघे रा. साकुर, रा. इगतपुरी), नीलेश संजय बोडके (रा. तळवाडे, ता. त्र्यंबकेश्वर) आणि ऋषिकेश दत्तात्रय काचोरे (वाडीवऱ्हे) यांना अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
3 ⁄ 3 =