घर पुणे जिल्हा इतर बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी व तीन शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी व तीन शेळ्या ठार

177
0

निरगुडसर :  आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथील शेतकरी सुरेश ज्ञानेश्वर जाधव ,भगवान धोंडू चिखले,यांच्या घराशेजारी असलेल्या गोठयातील बांधलेल्या मेंढीवर ,व तीन शेळ्यावर बिबट्याने हल्ला करत त्याना ठार केली असल्याची घटना घडली आहे.

टाकेवाडी ता,आंबेगाव पासून काही अंतरावर असलेल्या पठार भागात बिबट्याचे नेहमीच दर्शन होत आहे सोमवार दि,३ रोजी बिबट्याने पहाटे २:३० च्या सुमारास चिखले यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर हल्ला करत त्यांना ठार केले आहे. गोठयात आवाज झाल्याने चिखले व घरातील सदस्य बाहेर आले असता बिबट्या निघून गेला होता याबाबत वनअधिकारी के ,के,दाभाडे ,पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून नुकसान गत ग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

या परिसरात याआधी दोन वेळा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मात्र हा बिबटया याआधी पिंजऱ्यात अडकला असल्याने तो पुन्हा पिंजऱ्या कडे येत नाही त्यामुळे त्याला पकडणे अवघड झाले आहे.येथील शेतकरी चिखले यांचा शेळ्यांचा गोठा असल्यामुळे दररोज गोठ्याचे राखण करत रात्रभर गोठ्यात झोपावे लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
20 + 3 =