घर नगर जिल्हा केडगाव येथे महिलेस ट्रकने चिरडले

केडगाव येथे महिलेस ट्रकने चिरडले

121
0

नगर : केडगाव येथे भूषणनगर परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला आहे. शांताबाई आणि त्यांच्याबरोबर असलेली जखमी महिला या रस्त्याकडेला उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. शांताबाई ह्या ट्रक खाली सापडल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शांताबाई त्यांच्याबरोबर असलेली दुसरी महिला ही गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. जड वाहने शहरातून येतातच कसे, असा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनामुळे नगर-पुणे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करत होते. कोतवाली पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले होते. पण, आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या भावना तीव्र होत्या.नगर : केडगाव येथे भूषणनगर परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला आहे. शांताबाई आणि त्यांच्याबरोबर असलेली जखमी महिला या रस्त्याकडेला उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. शांताबाई ह्या ट्रक खाली सापडल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शांताबाई त्यांच्याबरोबर असलेली दुसरी महिला ही गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. जड वाहने शहरातून येतातच कसे, असा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनामुळे नगर-पुणे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करत होते. कोतवाली पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले होते. पण, आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या भावना तीव्र होत्या.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
24 × 25 =