घर पुणे जिल्हा शिरुर अवैध दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

अवैध दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

727
0

निरगुडसर : मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारगाव शिंगवे (ता ,आंबेगाव)गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल आठवन च्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात देशी विदेशी अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर मंचर पोलिसांनी मंगळवार दि ७ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास कारवाई केली आहे.हा दारू विक्री करणारा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की  मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश रोडे,पोलीस नाईक सागर गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल के,एस,पाबळे,हे पारगाव परिसरात पेट्रोलिग करत असताना मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णदेव खराडे यांना बातमीदाराने पारगाव हद्दीत असलेल्या हॉटेल आठवण च्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात अवैध दारूविक्री केली जात असल्याचे सांगितले त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस नाईक सागर गायकवाड यांनी दोन पंचांना घेऊन त्या ठिकाणी  जाऊन छापा मारला असता तेथे दारू विक्री सुरू असल्याचे कळले पोलिसांचा सुगावा लागताच दारू विक्री करणारा   महेश गंगाराम इचके  राहणार नागापूर ता ,आंबेगाव हा पळून गेला मात्र घटनास्थळी १५०८ रु च्या देशी दारू ,४९४ रु,पिल्लू संत्रा देशी दारू,९६० रु ऑफिसर चॉईस ,१०२० रु,किमतीच्या रॉयल स्टँग ,११२० रु,रोमन वोडका,१६०० रु ब्लेडर प्राईड,८२५ रु,किंमतीच्या किंगफिशर बॉटल असा एकूण ७,५२७ रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.या बाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश रोडे यांनी या बाबत फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सागर गायकवाड करत आहे .

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
50 ⁄ 25 =