घर राष्ट्रीय 22 जानेवारीला निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणार !!

22 जानेवारीला निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणार !!

सात वर्षानंतर अखेर प्रतिक्षा संपली

87
0

2012मध्ये दिल्लीतील बहुचर्चित निर्भया गँगरेप प्रकरणातील 4 दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. पटियाला हाऊस कोर्ट निर्भयाच्या चार दोषींच्या शिक्षेची तारीख जाहीर केली आहे. यापूर्वी कोर्टाने दोषींच्या फाशीच्या वॉरंटवरील सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली होती. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी एकाच्या वडिलांनी मुलाची फाशी पुढे ढकलण्याचा केलेला प्रयत्न सोमवारी अपयशी ठरला. पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिका फेटाळली आहे.

खरंतर, निर्भया दोषी पवन गुप्ताने पटियाला हाउस कोर्टात याचिका दाखल केली होती. निर्भयाच्या मित्राने पैशासाठी कोर्टात साक्ष दिली असल्याचा आरोप याचिकेत दोषी पवनने केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करावी असं त्याने पत्रात म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळली. दोषी पवन कुमार गुप्ताची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात आधीपासूनच फेटाळण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
29 × 26 =