घर नगर जिल्हा श्रीगोंदा श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपी जेरबंद

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपी जेरबंद

2176
0

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एका विवाहित नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीलाअटककेलेआहे

          घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की आरोपी अमोल शिंदे याने पारगाव सुद्रीक येथील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून पारगाव रोडवरील बायपास वर बोलावून घेतले. पीडितेची आई त्यावेळी घरात झोपली होती व भाऊ कामानिमित्त काष्टी येथे गेला होता.बायपासवर गेल्यानंतर आरोपीने मोटारसायकल वर बसण्याचा आग्रह केला. मी नकार दिल्याने त्याने हाताला ओढून बळजबरीने गाडीवर बसवले. मी गाडीवरून उडी टाकण्याची धमकी देऊनही त्याने गाडी श्रीगोंदा शहरातील  सृष्टी हॉटेलवर नेले. त्यावर ओळखपत्र नसल्याने आम्हाला हॉटेलच्या लॉजिगवर प्रवेश दिला नाही. आरोपीने लगेच मला गाडीवर बसवून त्याच्या राहत्या घरी वडाळी गावात नेले व ओळखपत्र घेऊन पुन्हा सृष्टी हॉटेलवर आणले व खोली भाड्याने घेतली. व खोलीवर बळजबरीने ओढून पीडितेच्या अनेकदा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बळजबरी केली. त्याने पहाटे फिर्यादीला  घरी सोडल्यानंतर  पीडितेने हा प्रकार आई व भावाला झालेला प्रकार कथन केला.त्यानंतर माझ्या भावाने व मेहुण्याने पीडितेला घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर मी आरोपी अमोल शिंदे याच्याविरोधात बलात्कारासह बाल लैगिंक प्रतिबंधक कायद्यानुसार फिर्याद दाखल केली.
      तातडीने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सूचना दिल्या प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गावीत व पोलीस हवालदार संजय काळे, प्रकाश मांडगे यांनी आरोपीला शिताफीने तात्काळ जेरबंद केले.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गावीत करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
30 × 1 =