घर नगर जिल्हा लाच घेताना कोतवाली पोलीस कर्मचारी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

लाच घेताना कोतवाली पोलीस कर्मचारी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

15
0

5000 हजार रुपयाची लाच घेताना कोतवाली पोलीस कर्मचारी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात police अहमदनगर : प्रतिनिधी – कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज रात्री हॉटेल इम्पेरियलसमोर ही कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. अनिल अजिनाथ गिरीगोसावी (वय 33, पोलिस हवालदार, कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर, रा. प्लॉट नं. 100, माधवनगर , भूषणनगर , केडगाव, अहमदनगर) हे पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गिरीगोसावी यांच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार हे फिर्यादी आहेत. सदर गुन्ह्यात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस हवलदार गिरीगोसावी यांनी पंचासमक्ष 5000/- रु लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरातील जुने बसस्थानक येथील हाॅटेल इम्पिरिअलसमोर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
13 + 24 =