घर नगर जिल्हा जामखेड कार अपघातात आडत व्यापारी विशाल पवार यांचा मृत्यू

कार अपघातात आडत व्यापारी विशाल पवार यांचा मृत्यू

47
0
जामखेड : आष्टी तालुक्यातील पोखरी जवळ कायम धोकादायक ठरलेल्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. झालेल्या अपघातात जामखेड येथील आडत व्यापारी विशाल उर्फ बंटी काकासाहेब पवार वय ३० हे ठार झाले तर आकाश अभिमन्यू उगले (जामखेड) व पवन गायकवाड (जातेगाव) हे दोघं गंभीर जखमी झाले असल्याने अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
विशाल पवार हे आडत व्यापारी असल्याने सोयाबीनची गाडी भरण्यासाठी आपल्या मित्रांबरोबर गुरुवार दि २६ रोची दुपारी आष्टी तालुक्यात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरच्यांच्या संपर्कात होते. रात्री अपघातानंतर गाडी झाडावर आदळून दूर झाडाझुडपात अडचणीत पडली होती.बराच काळ कोणाच्या निदर्शनास आले नाही. अंदाजे ४-५ तास ते गाडीत अडकून पडले होते. पहाटे पाचच्या सुमारास पोखरी परिसरातील काही तरूण व्यायामासाठी जात असतांना सदर गाडी दिसुन आली त्यामुळे रात्री नेमका कधी अपघात झाला हे स्पष्ट झाले नाही. मयत विशाल पवार यांच्या मृतदेहाचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मयत विशाल पवार यांच्या पश्चात आई पत्नी, एक मुलगा एक मुलगी आहेत. तालुक्यातील पाडळी येथे दूपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
9 + 12 =