घर नगर जिल्हा अहमदनगर ‘अर्बन’च्या थकबाकीदारांवर जप्ती कारवाई; तीन मालमत्ता ताब्यात

अहमदनगर ‘अर्बन’च्या थकबाकीदारांवर जप्ती कारवाई; तीन मालमत्ता ताब्यात

149
0

नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेने बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सुमारे 100 थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, शहरातील तीन कर्जदारांच्या मालमत्ता बँकेने कारवाई करुन जप्त केल्या आहेत. गुरुवारी (दि.26) बँकेने पारशाखुंट परिसरात कारवाई करत एका मालमत्तेचा ताबा घेतल्याची माहिती बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांनी दिली.
कर्जवाटपातील अनियमिततेमुळे चर्चेत आलेल्या नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी पदभार स्वीकारल्यापासून मोठ्या कर्जदारांकडील थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठराविक कर्जदारांकडे सुमारे 150 ते 200 कोटींची थकबाकी असल्यामुळे बँकेच्या ‘एनपीए’त वाढ झालेली आहे. एनपीए कमी करण्यासाठी वसुलीवर जोर देण्यात आला असून, सुमारे 100 थकबाकीदारांना नियमानुसार जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यातील मुदत संपलेल्या थकबाकीदार, कर्जदारांच्या मालमता जप्त करण्याची कारवाई बँकेने सुरू केली आहे.
मागील काही दिवसांत बँकेने पाईपलाईन रोडवरील वामन चष्मावाला, विठ्ठल पाटील यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. तर गुरुवारी पारशाखुंट येथील आई तुळजाभवानी ट्रान्सपोर्टचे भागीदार भगवान देवप्पा हरबा व सुरज भगवान हरबा यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्याकडे 5.06 कोटींची थकबाकी आहे. बँकेने सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत ही कारवाई करुन मालमत्तेचा ताबा घेतला असल्याचे साळवे यांनी सांगितले. दरम्यान, आणखी काही थकबाकीदारांना बँकेकडून जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात एमआयडीसीमधील काही कंपन्यांचाही समावेश आहे. मुदतीत थकबाकी जमा न झाल्यास त्यांच्यावरही जप्ती कारवाई केली जाणार असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
32 ⁄ 16 =