घर इतर राजकीय वादातून पाथर्डी तालुक्यातील नांदूर येथे गोळीबार

राजकीय वादातून पाथर्डी तालुक्यातील नांदूर येथे गोळीबार

दोन गटात हाणामारी! ‌ सेवानिवृत्त जवानांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तीघे जखमी.

30
0
पाथर्डी  :पाथर्डी तालुक्यातील निंबेदैत्य नांदूर येथे गावातील राजकीय वादातून दोन गटात झालेल्या गोळीबारात
सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 50)  यांचा मुत्यू झाला तर ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30)  भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर  पाथर्डी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुढील हकीकत अशी की. पाथर्डी तालुक्यातील निंबेदैत्य नांदूर येथे गावातील मंगळवारी रात्री  सात वाजण्याच्या सुमारास राजकीय वादातून दोन गटात तूफान हाणामारी झाली या वेळी एक गटातील सेवा  निवृत्त जवानांनी केलेल्या गोळीबारात सरपंचासह चार जण जखमी झाले. आहेत.
या घटनेतील दोन जखमीं  ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) अत्यवस्थ अवस्थेत नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेतील मयत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी तीन ते चार वेळा वाद झाले आहेत. 
 
आज सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटात मारामारी झाली. त्यात शाहदेव दहिफळे यांनी पिस्तूलमधून संजय दहिफळे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. 
 
या वेळी झालेल्या मारामारीत संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांना जबर मार लागला. भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला.
यातील जखमी सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, दाखल झाले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
19 + 10 =