घर नगर जिल्हा कोपरगाव कोपरगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

कोपरगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

35
0

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार होता. आऱोपींचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध करून आरोपीबाबत माहिती मिळाल्यास पाठवण्याचे आवाहन केले होते. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमधील तपास पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी 5 दिवस मेहनत घेतली. आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली होती. अखेर आरोपी अमोल अशोक निमसे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. फरार झालेल्या आरोपींचा पाच दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स. पो. नि सदिप पाटील. स. पो. नि देशमुख. पो. स ई गणेश इंगळे. यांचे पथक गेल्या पाच दिवसापासून आरोपीचा शोध घेत होते. आरोपी सापडत नसल्याने मंगळवारी पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र जारी केले होते. पाच विविध ठिकाणी पथके आरोपीच्या शोधात पाठविण्यात आली होती. आरोपी एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्याला अटक केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
24 × 8 =