घर आरोग्य कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त

कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त

39
0

प्राचिन मान्यता आहे की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याअगोदर दही खाल्ल्याने त्या कामात यश मिळते. यासोबतच दही आरोग्यासाठीही चांगले असते. यामध्ये काही असे रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे ते दुधापेक्षा लवकर पचते. ज्या लोकांना अपचन, बध्दकोष्ट, गॅस अशा समस्या आहेत त्यांनी दह्यापासून तयार केलेले पदार्थ जसे की, लस्सी, ताक यांचा उपयोग अधिक करावा. हे खाल्ल्याने डायजेशन योग्य प्रकारे होते आणि भूक लागते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सारखे पोषक तत्त्वे असतात. दात आणि हाडांना मजबूत बनवणार्‍या कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त असते.
अनिद्रा : रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर नियमित जेवणासोबत एक वाटी दही सेवन करावे. यामुळे ही समस्या हळुहळू दूर होईल.
पचनशक्ति वाढवते : दहीचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले गेले आहे. तेे रक्तातील कमतरता आणि अशक्तपणा दूर करते. दूध जेव्हा दहीचे रुप घेते तेव्हा दूधातील शर्करा आम्लाचे रुप घेते. यामुळे पचनक्रियेत मदत मिळते, ज्या लोकांना खूप कमी भूक लागते त्यांना दहीचा खुप फायदा होतो.
पोटातील उष्णता दूर करते : दह्याचे ताक किंवा लस्सी बनवून प्यायल्याने पोटातील उष्णता शांत होते. तुम्ही भातासोबत दही मिसळूनही खाऊ शकता. पोटाच्या अन्य आजारांसाठी दह्यामध्ये सेंधा मीठ टाकून सेवन केल्याने फायदा होतो.
आतड्यांचे रोग : अमेरिकी आहार विशेषज्ञांप्रमाणे दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग आणि पोटासंबंधीत आजार होत नाही.
हृदयाचे रोग : दहीमध्ये हाय ब्लड प्रेशर आणि मूत्रपिंडाचे आजार थांबवण्याची क्षमता असते. हे कोलेस्ट्रॉलला वाढण्यापासून थांबवते आणि हृदयाचे ठोके योग्य ठेवते.
हाडांना मजबूत करते : दह्यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असते. हे हाडांच्या विकासासाठी मदत करते. सोबतच हे दात आणि नखांसाठी फायदेशीर असते. यामुळे मासपेशींना योग्य प्रकारे काम करण्यात मदत मिळते.
जॉइंट पेन : हींगाची फोडनी टाकून दही खाल्ल्याने जॉइंट पेन होत नाही. हे स्वादिष्ट असण्यासोबतच पौष्टीक असते.
मूळव्याध : मूळव्याध असलेल्या लोकांना दुपारच्या जेवनानंतर एक ग्लास ताकात ओवा टाकून प्यायल्याने फायदा होतो.
वजन : बारीक किंवा वजन कमी असणार्‍या लोकांना जर दह्यामध्ये मनुके, बदाम टाकून दिल्याने त्याचे वजन वाढते. तसे पाहिले तर दह्याच्या सेवनाने शरीराची अतिरिक्त चरबी कमी करता येते.
सौंदर्य : दही शरीरावर लावून अंघोळ केल्याने त्वचा सुंदर आणि कोमल बनते. दह्यामध्ये लिंबूचा रस मिळवून चेहरा, मान, टाचा, हाताचे कोपरं यांवर लावल्याने शरीर उजळते, तसेच दह्याच्या लस्सीमध्ये मध मिसळून प्यायल्याने सौंदर्यात भर पडते.
केसांची सुंदरता : केसांना सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी दही किंवा ताकाने केस धुतल्याने फायदा होतो. यासाठी अंघोळी अगोदर केसांची दह्याने चांगल्या प्रकारे मालिश करावी. काही काळानंतर केसांना धुवून घ्यावे, केसांची चमक वाढते.
तोंड येण्याची समस्या : दह्याची साय तोंड आलेल्या जागेवर दोन-तीन वेळा लावल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते. दही आणि मध समान प्रमाणात मिसळून सकाळ-संध्याकाळी सेवन केल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते.
रोग प्रतिकारक क्षमता वाढवते : दही रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. यामुळे दमा आणि अ‍ॅलर्जीच्या आजारांपासून वाचता येते. दातांसंबंधीत समस्यांसाठीही दह्याचे सेवन फायदेशीर असते.
घाम : उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त घाम येतो. अशात दही आणि बेसनच्या मिश्रणाने मालिश करा. काही वेळानंतर अंघोळ करुन घ्यावी. घामाची दुर्गंधी दूर होईल.
लहान मुलांचे दात : ज्या मुलांचे दात निघत आहेत त्या मुलांना दह्यासोबत मध मिसळून चाटवावे. दात निघतांना जास्त त्रास होत नाही.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
2 + 16 =