घर महाराष्ट्र मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा बळी !

मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा बळी !

13
0

 : मुंबईच्या चुनाभट्टीत कारच्या धडकेत एका  तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. काल रात्री सव्वानऊ वाजता एका भरधाव चार चाकीने वीस वर्षीय अर्चना पार्टी या तरुणीला उडवलं. चार चाकीमधले चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्यातून चालणाऱ्या तीन तरुणींच्या अंगावर गाडी घातली. त्यापैकी एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर चालकाने गाडी सोडून पळ काढला. मात्र, स्थानिकांनी इतर दोघांना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतर मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या संतप्त नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरू केलं. काहीही चूक नसताना एका 20 वर्षांच्याया तरुणीला आपला जीव गमवावा लागला.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
18 + 19 =