घर राष्ट्रीय अजित पवारांचा पाठींब्यावर अमित शहांनी सोडले मौन !

अजित पवारांचा पाठींब्यावर अमित शहांनी सोडले मौन !

162
0

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक महिना सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यात आता एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की अखेर भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवला तरी कसा. या निर्णयावर खुद्ध पक्षातूनच प्रश्न विचारले जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील यावर सवाल उपस्थित केला आहे. अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत त्यांचा पाठिंबा घेण्याची गरज नव्हती. अजित पवारांचा पाठिंबा घेण्यावरून भाजपमधील नेते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. आता या सर्वावर खुद्द भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी उत्तर देऊ असे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांना अजित पवारांचा पाठिंबा का घेतला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शहा म्हणाले, अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते होते. पक्षाने त्यांना सरकार स्थापन करण्याचा अधिकार दिला होता. राज्यपालांनी देखील त्यांचा सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले होते आणि त्यांनीच सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले होते. अजित पवारांनी स्वत:हून आम्हाला पाठिंबा दिला होता आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याच्या पत्रावर अजित पवार यांची स्वाक्षरी आहे. इतक नव्हे तर अजित पवार यांचा पाठिंबा घेतला म्हणून त्यांच्यावरील कोणताही खटला मागे घेतला नाही. अशा प्रकारच्या बातम्या केवळ मीडियाने दिल्या आहेत. तसेच अजित पवारांचा पाठिंबा घेत असताना आम्ही विचारसरणीशी कोणत्याही पद्धतीची तडजोड केलेली नसल्याचे शहा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
21 − 3 =