घर नगर जिल्हा राहुरी राहुरीत दरोडेखोर व पोलिस पथक यांच्यात धुमश्चक्री 

राहुरीत दरोडेखोर व पोलिस पथक यांच्यात धुमश्चक्री 

चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद

197
0
राहुरी  : राहुरी शहरात  सोमवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळी संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली . या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी सव्वातीन वाजता पोलिस पथक गेले . पोलिस पथक पाहताच दरोडेखोरांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढविला . यात दरोडेखोर व पोलिसांत धुमश्चक्री झाली . याचा फायदा घेत टोळीतील दरोडेखोर पसार होऊ लागले मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने चार अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळविले .

                 पसार असलेल्या दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे . सशस्त्र दरोडेखोरांची टोळी व पोलिस पथक यांच्यात धुमश्चक्री झाली . पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून , टोळी पळाली . त्यांचा पाठलाग करून , शहरात विविध ठिकाणी चार अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली . सकाळी सात वाजेपर्यंत ही धरपकड सुरू होती . दरोड्याचे साहित्य , दोन दुचाकीसह एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला . एका चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाले . सागर गोरख मांजरे ( वय 22 , रा . पाईपलाईन रस्ता , यशोदानगर जवळ , नगर ) , अविनाश अजित नागपुरे ( वय 20 , रा . भिंगार , ता . नगर ) , काशिनाथ मारुती पवार ( वय 37 , रा . बजरंगवाडी , ता . संगमनेर ) , गणेश मारुती गायकवाड ( वय 24 , रा . उक्कलगाव , ता . श्रीरामपूर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . पसार दोन आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत

          आरोपींकडून गॅस कटर , एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर , एक ऑक्सिजन गॅस सिलेंडर , एक तलवार , टॉमी , लोखंडी कटावणी , लोखंडी कात्री , लोखंडी गज , लोखंडी पोखर , लोखंडी सुरा , एक आगपेटी , चार मोबाईल , दोन दुचाकी असे साहित्य पोलिसांनी जप्त केले . पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी माहिती देतांना सांगितले की , गोकुळ कॉलनी येथे आज पहाटे तीन वाजता एका मोबाईल शॉपीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोरांची टोळी उभी असल्याची माहिती राहुरी पोलिस ठाण्यात समजली . पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख , सहाय्यक निरीक्षक यशवंत राक्षे , कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे , सोमनाथ जायभाये , सुशांत दिवटे , रवींद्र मेढे , अमित राठोड , गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे , ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली . दोन दुचाकी , एक चार चाकी वाहन व दरोडेखोरांची टोळी कामगिरीच्या तयारी होती . पोलिस पथकाला पाहिल्यावर जवळच असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यातून विटांचे तुकडे पोलिसांच्या दिशेने फेकून दरोडेखोरांनी धूम ठोकली . पळतांना एक जण तोंडावर आपटला . त्यास घटनास्थळापासून जवळच पोलिसांनी पकडले .       दरोडेखोरांचा पोलिस पथकाने पाठलाग सुरू केला . एकाला व्यापारी पेठ , एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ , एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले . चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाले . दरोडेखोरांचा म्होरक्या असलेला सागर मांजरे हा श्रीरामपूर येथील बालाणी यांच्या घरावरील दरोड्याच्या mn प्रकरणातून दीड महिन्यापूर्वी श्रीरामपूर कारागृहातून सुटलेला आहे . त्याच्यावर श्रीरामपूर , तोफखाना ( नगर ) व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत . तीन दिवसांपूर्वी राहुरी एमआयडीसी जवळील सागर गुंजाळ यांच्या दुकानातून चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाले .

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
4 × 10 =