घर आरोग्य प्राणायाम करण्याचे अनेक प्रकार…

प्राणायाम करण्याचे अनेक प्रकार…

25
0

आजच्या या भागमभाग आणि व्यस्त जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक स्तरावर फिट राहण्यासाठी प्राणायाम साहाय्यक आहे. प्राणायाम करण्याने मानसिक तणाव दूर तर होतोच शिवाय शरीरास भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचीही पूर्ती होते. प्राणायाम हा श्‍वासासंबंधित असा व्यायाम आहे, ज्याच्याद्वारे शरीराच्या प्रत्येक अंगात ऑक्सिजनची पूर्तता होते. त्याचबरोबर रक्तसंचारही गतिशील राहून रक्तशुद्धी होते.
नियमित प्राणायाम करण्याने दिवसभराचा तणाव दूर होतो आणि शरीरात स्फूर्ती येते. तन आणि मनाने फिट राहण्यास प्राणायामाने मदत होते. प्राणायाम करण्यासाठी प्रथम पद्मासनाच्या मुद्रेत बसावे आणि खोल श्‍वास घ्यावा, नंतर हळू हळू सोडावा. याने संपूर्ण तणाव दूर होतो. प्राणायामाचा विधी उभ्या स्थितीतही करता येऊ शकतो. यासाठी साधारण रिती अशी की, उंच जागी सरळ ताठ उभे राहून श्‍वास व्यायाम करावा. दोन्ही हात वर करून श्‍वास जितका आत ओढता येईल तितका ओढावा. डोक्यावर दोन्ही हात जुळेपर्यंत ही क्रिया संपावयास हवी. नंतर दोन्ही हात खाली आणताना श्‍वास जितका बाहेर सोडता येईल, तितका सोडावा. प्राणायाम करण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. शक्यतो हा विधी एखाद्या जाणकारांकडून शिकावा. योग्य शिक्षकाकडून हा विधी शिकल्यास चांगले. सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे प्राणायाम करणे स्वास्थ्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
16 + 21 =