घर क्रीडा इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

45
0

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला आहे. एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवत भारताने बांगलादेशविरुद्ध मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना २२ डिसेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा १० वा डावाने विजय ठरला आहे. धोनीने कर्णधार म्हणून ९ सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवून दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
14 × 12 =