घर नगर जिल्हा राहुरी आ. कर्डीले यांचा निषेध करीत विविध संघटनाचा राहुरीत महामार्गावर चक्काजाम

आ. कर्डीले यांचा निषेध करीत विविध संघटनाचा राहुरीत महामार्गावर चक्काजाम

61
0
राहुरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री निवेदन देण्यासाठी आलेल्या राहुरी तालुक्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने ताब्यात घेऊन दिवसभर डांबून ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ १४ सप्टेंबर रोजी सकाळी नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आमदार कर्डीले यांचा निषेध करण्यात आला.
                    राहुरी शहरातील वाय एम सी ग्राउंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी छावा संघटना, वंचित बहुजन आघाडी, समता परिषद, वावरथ जांभळी येथील महिला पुरूष आणि तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सभेच्या ठिकाणी उपस्थित होते. मराठा आरक्षण, धनगर समाज आरक्षण, वावरथ जांभळी येथील पुल अशा विविध मागण्यांसाठी त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून निवेदन द्यायचे होते. मात्र पोलिस प्रशासनाने त्यांना सभेच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आणि दिवसभर पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. सायंकाळी सात वाजता सर्व महिला पुरूषांना सोडून देण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक यांच्या दालना समोर काही काळ ठिय्या आंदोलन केले.
       तसेच दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. या प्रसंगी अनेकांनी भाजप सरकारचा निषेध करत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या बाबत चांगलेच तोंडसुख घेतले. आमदार शिवाजी कर्डीले हे नागरिकांची मुस्कटदाबी करत आहे. डांबून ठेवायला आम्ही गुंड प्रवृत्तीचे नाही. गुंड प्रवृत्तीचे तूम्ही आहात. तूम्ही किती काळ तुरुंगात होता, हे तालूक्यातील सर्व जनतेला चांगले माहित आहे. असे मनोगत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी चक्काजाम आंदोलन प्रसंगी केले.
                    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सनदशील मार्गाने तालुक्यातील समस्यांचे निवेदन सर्व कार्यकर्ते देणार होते. परंतू पोलिस प्रशासनाला हाताशी धरुन सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनीधींना राहुरी पोलिस ठाण्यात स्थानबध्द करुन ठेवले. तालुक्यातील जनतेचा आवाज दाबण्याचे काम हे भाजप सरकार व आमदार शिवाजी कर्डीले हे करत आहे. असा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला आहे. या प्रसंगी वर्षाताई बाचकर, रत्नमाला मकासरे, सुशाबाई बर्डे, मंदाबाई बर्डे, लताबाई बर्डे, परिगाबाई बाचकर, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे सुनील गुलदगड, समता परिषदेचे प्रशांत शिंदे, धनगर आरक्षण कृती समितीचे ज्ञानेश्वर बाचकर आदिं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
9 + 29 =