घर नगर जिल्हा राहुरी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून सध्या लोकशाही संपवण्याचे काम सुरु : वामन मेश्राम

ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून सध्या लोकशाही संपवण्याचे काम सुरु : वामन मेश्राम

84
0
राहुरी : इव्हिएम मशीनच्या माध्यमातून लोकशाही नष्ट करण्याचे काम सत्ताधारी व निवडनुक आयोग संगनमताने करत आहे. इव्हिएम च्या वापरा मुळे जनतेच्या पाठिंब्याची गरज भाजपाला नाही, लोकांनी कुणालाही मत दिले तरी इव्हिएम हँक करुन सत्तेत पुन्हा भाजपाच येते. निवडणुक आयोग देखिल सरकारच्या हातातले बाहुले असल्याचे सांगून देशात लोकशाही यंञनेला धोका निर्माण झाला असल्याचे बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सांगितले.
                              बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत निघालेली राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली असून ही यात्रा राहुरी तालुक्यात दाखल झाली.मुळा डॕम फाटा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मार्केट यार्ड राहुरी या ठिकाणी नागरिकांनी याञेचे भव्य स्वागत केले. यानंतर गाडगे बाबा आश्रम शाळा येथे आयोजित सभेत त्यांनी मार्गदर्शन केले प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की येणाऱ्या काळात सर्व बहुजन समाजाने इव्हिएम च्या विरोधासाठी एकीची वज्रमुठ करावी या जागृती करीता ही याञा काढल्याचे प्रसंगी मेश्राम यांनी सांगितले .
                       दरम्यान निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रिम कोर्टात गेलेले बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम हे परिवर्तन यात्रेचे नेतृत्व करत असल्याने त्यांना राज्यातील, जिल्यातील व प्रत्येक तालुक्यात विविध लोकहितवादी, पुरोगामी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव यांनी केले.यावेळी रिपाई चे तालुकाध्यक्ष विलास साळवे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड,अ.भा.समता परीषदेचे प्रशांत शिंदे ,यशवंत सेनेचे विजय तमनर, बहुनज मुक्ती पार्टिचे अब्दुलभाई आतार,सभापती मनिषाताई ओहोळ,एकलव्य संघटनेचे अनिल जाधव,कांतीलाल जगधने,इम्रान सय्यद ,आर.आर.तनपुरे आदि मान्यवर उपस्थित होते.
सुञसंचलन संजय संसारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राहुल पटेकर यानी मानले.
  • वामन मेश्राम यांचे निवडणुक आयोगाला खुले आव्हान !इव्हिएम च्या संदर्भात मी केलेले आरोप खोटे आसतील तर निवडणुक आयोगाने माझ्या विरुद्ध केस करावी.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
7 ⁄ 1 =