घर नगर जिल्हा राहुरी देवळाली प्रवरा वाणी मळ्यात आढळला बिबट्या!

देवळाली प्रवरा वाणी मळ्यात आढळला बिबट्या!

नागरिकांच्या सहकार्याने वनविभागाच्या ताब्यात!*

32
0
देवळाली प्रवरा : बिबट्याचा रात्रंदिवस संचार, शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत, शेतकऱ्यांचे अनेक मुकी जनावरे फस्त, अशा देवळाली प्रवरा तील अनेक बातम्या यापूर्वीही प्रसिद्ध केले गेल्या आहेत अनेक वेळा वनविभागाचे पिंजरे देखील लावण्यात आले आहे परंतु तरीदेखील देवळाली प्रवरा परिसरामध्ये बिबट्यांचा व वाघांचा मुक्तसंचार पहावयास मिळतो त्याच प्रत्यय आज देवळाली करांना आला
          देवळाली प्रवरा येथील संजय सावित्रा वरखडे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये काल रात्रीपासून पडलेला बिबट्या आज सकाळी त्यांच्या पत्नी मंगलाबाई ह्या जेव्हा शेतामध्ये जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले असता त्यांना विहिरींमधून अचानक आवाज आल्याचे आढळले पुढे जाऊन विहिरीत बघितले तर बिबट्या त्याठिकाणी पडलेला होता त्यांनी ताबडतोब याची माहिती आपल्या घरी दिली त्यावेळेस मंजाबापू सावित्रा वरखडे यांनी देवळाली प्रवरा चे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना फोन द्वारे बिबट्या विहिरीत पडले असल्याची माहिती सांगितली त्यानंतर घटनास्थळी नगराध्यक्ष सत्यजित कदम उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे गटनेते सचिन ढुस यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी धाव घेतली नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी ताबडतोब वन विभागाशी संपर्क साधून बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती दिली त्यानंतर वनविभागाची अधिकारी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी पिंजरा घेऊन दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला दोराच्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडून वर काढण्यात यश आले व पकडलेला बिबट्या हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी जीएन लोंढे यांनी सांगितले
   यावेळी देवळाली प्रवरा चे नगराध्यक्ष सत्यजित कदम उपनगराध्यक्ष प्रकाश संसारी गटनेते सचिन भाऊस माजी नगरसेवक डॉक्टर संदीप मुसमाडे संदीप कदम,तसेच वनविभागाचे जीएन लोंढे गायकवाड गायकवाड एलजी किंनकर जीबी लांबे व्ही आर दिवे पिबी कोहकडे आदींनी परिश्रम घेतले यावेळी बघ्यांची तोबा गर्दी झाली होती

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
36 ⁄ 9 =