घर नगर जिल्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये काम करणार : आ. पिचड

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये काम करणार : आ. पिचड

1338
0

अकोले । प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये काम करणार असून नवीन जुने कार्यकर्ते यांचा मेळ घालू असे मत अकोले चे आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले
आमदार पिचड यांचा भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यकर्तेच्या मनोगत जाणून घेताना . यावेळी भाजप जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पंस सदस्य दत्ता देशमुख, अगस्ती साखर कारखाना माजी संचालक भाऊसाहेब वाकचौरे, तालुका उपाध्यक्ष गणेश पोखरकर, सुभाष वाकचौरे, प्रकाश कोरडे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके, हे उपस्थित होते.
अकोले तालुक्याचा विकास करायचा असेल तर भाजप मध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगले काम आहे गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल योजना, उज्ज्वला ग्यास योजना, महिला साठी शौचालय योजना राबविण्यात आली हि खरी कामगिरी असून जगात देशाच नाव केलं आहे. अकोले तालुक्यातील प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आहे फक्त आमदार राहून तालुक्यातील प्रश्‍न सुटत नसतील तर मग काय कामाचे पद हा विचार केला आहे. कोणताही सत्ताधारी विरोधकांचे काम होत नसतात. म्हणून फक्त तालुक्याच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेत आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठ्या मनाने प्रवेश देऊन स्वागत केले ही आनंदाची बाब आहे असे मत आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.
भाजपचे जीप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी भाजप हा सर्वसमावेशक पक्ष आहे. त्यात आदिवासी समाजाचे महाराष्ट्र राज्यचे नेते पिचड साहेब पक्षात येतात ही पक्षाचे दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या पक्षात आम्ही आमदारकीचे स्वप्न आम्ही पाहिले. ते प्रत्यक्षात फुलताना पाहताना आनंद होत आहे.
भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी आमदार पिचड यांचा प्रवेश हा पक्षातील सुवर्णक्षरांनी लिहिणारा आहे. त्यांच्या प्रवेश हा आमच्या सारख्या कार्यकर्ते ना उभारी मिळणार असून अकोले तालुका विकासात साथ मिळणार आहे. यासाठी आम्ही सगळे त्यांना साथ देणार असल्याचे ग्वाही दिली
यावेळी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष ईश्‍वर वाकचौरे, सरचिटणीस सुनील उगले, दलित आघाडी अध्यक्ष सुरेश पवार,सरचिटणीस सावळेराम गायकवाड, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कानवडे,वाल्मीक देशमुख, वाल्मीक नवले, अमोल कोटकर, सुनील पुंडे, ज्ञानेश पुंडे, शेतकरी आघाडी चे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र वाकचौरे, सरचिटणीस नरेंद्र नवले, दिव्यांग सेल चे तालुकाध्यक्ष अमर मुरूमकर, मच्छिंद्र चौधरी, केशव बोडके, जालिंदर बोडके, राजेंद्र लहामंगे, संजय लोखंडे, सुशांत वाकचौरे, माधव ठुबे, सचिन दातीर, शुभम खर्डे, मदन आंबरे, अंकुश वैद्य, राहुल चव्हाण, राम रुद्र, शैलेश फटांगरे, प्रवीण सहाणे, आदींनी यावेळी मत व्यक्त केली चौकट,तर यावेळी भाजपचे अशोकराव भांगरे, शिवाजीराजे धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य सुनिता भांगरे, डॉ किरण लहामटे ,यांची या बैठकीत पाठ फिरवली त्यामुळे भांगरे गट,लहामटे गट काय निर्णय घेणार याकडे लक्ष वेधले असले तरी युती होते की नाही यावर अवलंबून आहे मात्र बारामतीचे काही नेत्यांचा संपर्क असुन अजित पवार यांनी देखील अकोले विधानसभा मतदारसंघाकडे ताकत लावणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजते

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
30 ⁄ 10 =