घर नगर जिल्हा आ. पिचड राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही !

आ. पिचड राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही !

सोशल मिडीयावरील चर्चा निरर्थक : गायकर पा.

1416
0
अकोले : राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. वैभवराव पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाय बाय करत लवकरच शिवधनुष्य हाती घेणार की भाजप मध्ये दाखल होणार यावर सोशल मिडीयावर गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरु असली तरी या अगोदर देखील आ. वैभवराव पिचड यांनी स्वतः पत्रकार परीषद घेवून राष्ट्रवादी पक्ष आम्ही सोडणार नसून आम्ही आहे तेथे सुखी असल्याचे सांगितले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपुर्वी त्यांचेच परममित्र शहापूर मतदार संघाचे आ. पांडुरंग बरोरा यांनी देखील राष्ट्रवादीला बाय बाय करत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेतल्याने त्यानंतर अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप व आ. वैभवराव पिचड यांच्या देखील पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु असून नेमकी लोकप्रतिनिधी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले असले तरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा अजित पवार यांचे कट्टर समर्थक सीताराम पाटील गायकर यांनी मात्र कुठेही पक्ष प्रवेश होणार नसून आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वावर आमचा विश्‍वास असून कोणत्याही चर्चा घडत असल्यातरी या चर्चांना अर्थ नाही. मुंबई येथे कुठेही व कोणत्याही नेत्याचे घरी आमची बैठक झाली नसल्याचे सीताराम पा. गायकर यांनी सांगितले.
तर अकोले विधानसभा मतदार संघ हा गेल्या 35 वर्षापासून लोकप्रतिनिधी पिचड यांचे वर्चस्व असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिचड कुटुंबियांना उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, दुग्धविकास मंत्री, प्रदेशाध्यक्ष यासह जिल्हयात जिल्हा बँक, जिल्हा परीषद, व विविध समित्यांवर मानाचे पदे दिली. तर राष्ट्रवादी पक्ष स्थापनेवेळी ते संस्थापक सदस्य असून ते कधीही शरदचंद्र पवाराचे नेतृत्व अमान्य करणार नाही. उलट राज्यभरात त्यांनी पक्ष संघटन करत पवार कुटुंबियांचा विश्‍वास संपादन केला आहे. तर काही राजकीय नेत्यांच्या मते विजयसिंग मोहिते पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजपात प्रवेश केला. पिचड व मोहिते कुटुंबियांचे संबध सलोख्याचे असून मोहितेंनी भाजपात येण्याचा आग्रह पिचडांकडे धरला असल्याचे समजते.
लोकप्रतिनिधी आ. वैभवराव पिचड हे विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मतदार संघात दिसून येत नाहीत. व त्यांच्या संपर्क कार्यालयात व कार्यकर्त्यांमध्ये देखील पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नेमकी शिवसेनेत की भाजपात दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले असले तरी अकोले विधानसभा ही जागा सेना, भाजपाची युती झाल्यानंतर शिवसेनेकडे जाते, मात्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मुंबई येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 220 चा आकडा  भाजपा जिंकण्याचा दावा केला असल्यामुळे राज्यात युती होणार की, नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. युती न झाल्यास भाजपा ही जागा विद्यमान लोकप्रतिनिधी यांना देण्यासाठी इच्छुक आहे. यासाठी सेनेकडून देखील आ. वैभव पिचड यांना ऑफर देण्यात आली असून ठाणे जिल्हयातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले. यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आ. पिचडांच्या संपर्कात असल्याचे समजते. नेमकी सेना की भाजप प्रवेश करणार हे मात्र गुलदस्त्यात असल्याचे समजते.
मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोशल मिडीयावर आ. वैभव पिचडांचा भाजप नेत्यांबरोबर मुंबईमध्ये गुप्त बैठका सुरु असून दोन दिवसांपुर्वी मंत्रालयात देखील आ. पिचड व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली त्यावेळी पक्षबदल करु नका असा सल्ला देखील अजित पवार यांनी पिचडांना दिला. मात्र केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे मतदार संघात विकास निधी व विकासकामे करण्यासाठी सत्ताधारी पक्षाशिवाय लोकप्रतिनिधींकडे पर्याय नसल्याचे आता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते बोलू लागले आहे. तर पिचडांनी सेना भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत केले जाईल हे आता मात्र त्यांचे विरोधक बोलू लागले आहे. तर अनेकांनी आगामी निवडणूकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून मतदार संघ पिंजून काढले. त्यांना मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या घडयाळ हाती घेवून सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मात्र लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षात प्रवेश करणार ही चर्चा मात्र प्रत्येकाच्या मनात व मोबाईलवर संदेश प्राप्त होवू लागल्याने पिचडांना भाजपात घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र पिचड राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे त्यांचे खंद्दे समर्थक जि.बँकेचे अध्यक्ष सीताराम पा.गायकर यांनी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
19 × 14 =