घर नगर जिल्हा राहुरी कुटुंबाची काळजी घेण्याचे काम डॉक्टर करतात : अ‍ॅड. सुभाष पाटील

कुटुंबाची काळजी घेण्याचे काम डॉक्टर करतात : अ‍ॅड. सुभाष पाटील

22
0
राहुरी : कुटुंबाची काळजी घेण्याचे काम डॉक्टर करतात.त्यामुळे ते आपल्या कुटुंबाचे आरोग्य रक्षक असून अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केले.
                    राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ते  बोलत होते. ते म्हणाले, सुखाचे वाटेकरी अनेकजण असतात. मात्र,
आपल्या दुःखात आपल्या मनाला आणि शरीराला उपचार करण्याचे काम डॉक्टर करीत असतात.  त्यामुळे ते आपल्या कुटुंबाचे महत्वाचे घटक असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.
                      यावेळी डॉ.व्ही.एम. झंवर, सुरेशचंद्र बिहाणी, अतुल झंवर, ओमप्रकाश त्रिपाठी, सचिन काशिनाथ मोरे, प्रसन्ना बिहाणी, जगदीश भराडिया, के.जी. कदम, महेश कदम, भरत कदम, सचिन गेणू मोरे, पानसरे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पाटील, संजय राहिंज, वैभव पागिरे, धनंजय काळे, नितीन वाघ,
पिराजी धोत्रे, अभय बांठिया, संदीप जवरे, अविनाश जाधव, पाठक, कळमकर, हर्षल पटारे, कटारिया, दिपिका झंवर, अनुराधा बिहाणी, शितल मोरे, मनिषा
मोरे, शितल पाटील, सौ. भोकरे, प्राजक्ता जवरे, वृशाली वाघ, अबोली तरवडे, मोनाली कदम, आदी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
                   कार्यक्रमास सरपंच निशा व्यास, माजी सरपंच कावेरीताई पटारे, रोहिणीताई कुसमुडे, मंगल भाकरे, ताराबाई सोलंकी, उपसरपंच राजेंद्र पटारे, कृष्णा पटारे, शामराव पटारे, भानुदास कुसमुडे, देवीदास जवरे, रामभाऊ बोरकर, सुभाष दांगट, राजू साळुंके, फिरोज शेख, आरीफ कोतवाल, शिवाजी भाकरे, ग्रामविकास अधिकारी संजय गिर्‍हे, भाऊसाहेब ढोकणे आदींसह ग्रामस्थ
उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
21 − 14 =