घर नगर जिल्हा राहुरी वावरथ-जांभळी मार्गे पारनेरला जोडणार्‍या पुल बांधकाम करण्याची मागणी

वावरथ-जांभळी मार्गे पारनेरला जोडणार्‍या पुल बांधकाम करण्याची मागणी

61
0
राहुरी : मुळा धरणातून वावरथ-जांभळी मार्गे पारनेरला जोडणाऱ्या पुल बांधकाम मंजूर करून पूर्ण करावे या मागणीसाठी महिला संघर्ष समितीच्या वतीने काल पासून भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन तीव्र करण्यात आले. मुला बाळांसह महिला सहभागी झाल्या होत्या.
       जिल्हा प्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील अहमदनगर यांनी आंदोलकांशी बैठक घेउन चर्चा केली. पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून कामाचा प्रस्ताव तातडीने तयार करणे व शासनाकडे पाठविण्याचे ठरले. नव्या यांत्रिक बोट करिता जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. आज आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी, अहमदनगर चे कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलनाला वर्षाताई बाचकर, रत्नमालाताई मकासरे, लताबाई बर्डे, मंदाबाई बर्डे, परिघाबाई बाचकर, ज्ञानदेव मकासरे , रामदास बाचकर जांभळीच्या सरपंच शकुंतला बाचकर, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे कुमार भिंगारे, सागर दोंदे, रवींद्र तपासे, किरण विधाटे व डॉ जालिंदर घिगे सहभागी झाले. आंदोलनाचे नेतृत्व वर्षाताई बाचकर यांनी केले.
——————————————————-
          गेल्या पन्नास वर्षांपासून वावरथ ,जांभळी व जांभुळबन चे नागरिक दळणवळणाच्या सुविधे पासून वंचित आहेत. तसेच राहुरी तालुका पारनेर ला जोडला जाऊन लाखो लोकांच्या दळणवळणाची सोई होणार आहे. परंतु भाजप पक्षाचे लोकप्रतिनिधी कामाचा प्रस्ताव तयार करण्यास अडथळा निर्माण करत आहेत की काय? अशी शंका उपस्थित होत आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी सुटे पर्यंत सक्रिय राहणार आहे.
                -डॉ जालिंदर घिगे
                (वंचित बहुजन आघाडी,अहमदनगर, उत्तर)

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
22 ⁄ 11 =