घर क्रीडा टीम इंडियाला ‘गब्बर’ धक्का, शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर

टीम इंडियाला ‘गब्बर’ धक्का, शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर

39
0

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या शिखर धवनला दुखापतीने ग्रासले असून दुखापतीमुळे धवन वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे. शिखर धवनला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून फॉर्मात आलेला धवन संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला मोठा हादरा बसला आहे. शिखर धवनच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे शिखर धवन वर्ल्डकपला मुकण्याची चिन्हे आहेत. ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नॅथन कोल्टर – नाइलचा चेंडू धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. यामुळे धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षणासाठी आला होता. आता धवनला दुखापत झाल्याने सलामीला रोहित शर्मासोबत कोण येणार, असा प्रश्न टीम इंडियासमोर निर्माण झाला आहे. बीसीसीआयने अद्याप या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
8 × 16 =