घर नगर जिल्हा राहुरी समभावाची शिकवण बालवयातच बुध्दीवर रुजविणे काळाची गरज-पो.नि.हनुमंत गाढे

समभावाची शिकवण बालवयातच बुध्दीवर रुजविणे काळाची गरज-पो.नि.हनुमंत गाढे

55
0
राहुरी फॅक्टरी- अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक कार्यात आग्रगण्य समजल्या जाणार्या साई आदर्श मल्टी स्टेटच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील जामा मस्जिद येथे  रमजान ईद च्या अंतिम दिवसाच्या रोजा इम्तार पार्टी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक हनुमंत गाढे साहेब, संस्थेचे चेअरमन शिवाजी राव कपाळे साहेब,देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरसेवक गणीभाई शेख  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
इफ्तार पार्टी म्हणजे अल्पउपहार सेवन करुनच येणार्या नवीन पिढीला सर्व धर्म समभावाची शिकवण बालवयातच त्यांच्या बुध्दीवर रुजविणे हि काळाची गरज आहे. जेणे करुन धर्म आणि जातिवाद घडणार नाही. हिन्दु, मुस्लिम व इतर धर्मीय हे एकोप्याने जगले पाहिजे व्यवहारात आपणाला एकमेकाच्या गरजेची आवश्यकता  आहे तरी देखील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील हिन्दु-मुस्लिमा मध्ये कधीही वाद नसावा असे राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक हनुमंत गाढे यांनी रमजान ईद च्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतांना म्हणाले.
सर्व धर्मियानी सर्व सन एकत्रित येऊन साजरे करणे ही समुध्द भारतासाठी अभिमानाची आनंददायी बाब आहे असे मत शिवाजी राव कपाळे साहेब यांनी केले.
श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने अध्यक्ष विष्णुपंत गिते, पंतजली स्थायी समिती राहुरी तालुका  प्रभारी किशोर थोरात,प्रगतशील शेतकरी बाळासाहेब तांबे, डाॅ.विलास पाटील, यांनी ही आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.जामामस्जिद कमिटीतील सदस्यांनी प्रमुख उपस्थितीचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
सूत्रसंचालन व आभार शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले, प्रस्तवाना पत्रकार रफीक शेख, उपस्थित मुस्लिम बांधव डॉ. शौकत सय्यद, डॉ. फारूक सय्यद, बादशाह शेख, गुलाब शेख, मौलाना बशीर पठाण, शफी शेख, रईस शेख, जाकिर शेख, बशीर शेख, यूनुस शेख, कय्यूम शेख, शायबाज सय्यद, अजीम सय्यद, रियाज शेख, मोसीन शेख, आरीफ शेख, परवेज शेख, तौसीफ शेख, रहेमान शेख, दादा पेंटर, रमेश शेख, इब्राहिम पठाण, बाबामामु शेख, जावेद सय्यद, ओसामा शेख, रफीक शेख, शरीफ शेख, आसिफ शेख, बिलाल शेख, फारुख देशमुख, शोएब शेख, अनीस शेख, सिंकदर शेख, शादाब शेख, साकिब शेख, तौफीक शेख,मॅनेजर याकुब शेख  जनप्रावास पत्रकार विजय भोसले, व छायाचित्रकार सीताराम मुसमाडे तसेच मुस्लिम पंच कमिटी व ए.पी.जे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व अधिकारी सदस्याचे परिश्रम महत्वाचे ठरले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
30 × 5 =