घर नगर जिल्हा राहुरी नोकरीत शिक्षक कुटूंबाकडे दुर्लक्ष करून समाज घडविण्याचे काम करतो : माजी मंत्री...

नोकरीत शिक्षक कुटूंबाकडे दुर्लक्ष करून समाज घडविण्याचे काम करतो : माजी मंत्री बबनराव पाचपुते

58
0
राहुरी फॅक्टरी :  नोकरीच्या काळात शिक्षक हा कुटूंबाकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे सेवा करून समाज  घडविण्याचे काम करत असतो परंतु सेवानिवृत्तीनंतर तरी शिक्षकांनी स्वतःसाठी नव्हे नव्हे तर  कुटूंबासाठी वेळ द्यावा असे आवाहन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.
  चिंचविहिरे येथील मूळचे रहिवासी असलेले प्रा.डॉ.एम.व्ही.गीते अहमदनगर येथील न्यु आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविद्यायातून ३६ वर्ष प्रदीर्घ सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल राहुरी कारखाना येथील सुर्यनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात श्री.पाचपुते बोलत होते  यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, शिर्डीचे उपनगराध्यक्ष निलेश कोते, हनुमंत पाटोळे, अंबादास पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी प्रा. मच्छीन्द्र गीते यांच्याबरोबर त्यांना घडविणारे वडील विश्वनाथ गीते व आई केशरबाई यांचा सन्मान करण्यात आला.
   माजी मंत्री बबनराव पाचपुते व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पाचपुते यांनी स्वतःच्या कॉलेज जीवनातील अनेक आठवणीना उजाळा देत सामाजिक व राजकीय क्षेत्रात होत असलेल्या अलीकडच्या बदलाबाबत विनोदी शैलीत परामर्श घेतला. या कार्यक्रमास राहुरी अर्बनचे अध्यक्ष रामभाऊ काळे, विलास पाटील, किशोर थोरात, धोंडीराम सोनवणे, विष्णू गीते, बाबासाहेब ताठे, शिवाजी गीते, डॉ.भोर, डॉ.बारहाते, शिवाजी साबळे, अविनाश गायके, सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जालिंदर गीते, प्रभाकर विखे प्रयत्नशील होते.सूत्रसंचालन राजेश मंचरे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
16 ⁄ 16 =