घर नगर जिल्हा राहुरी छ. शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या पायल रोहतगीला अटक करा

छ. शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या पायल रोहतगीला अटक करा

संभाजी ब्रिगेड ची मागणी

40
0
 राहुरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या पायल रोहतगी ला अटक करा अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने
 राहुरी येथे तहसीलचे श्री दत्तात्रय गोसावी यांना देण्यात आले
काही दिवसांपूर्वी राजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रोहतगी हीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी पायल ने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुळातील नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाल्याचे’ वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे  शिवाजी महाराजांच्या लाखो अनुयायींना खूप वेदना झाल्या आहेत, तिच्या या वक्तव्या वरून तिची मानसिकता हि निच वृत्तीची  दिसून येते , हा देश  शिवरायांच्या विचाराने घडला आहे , छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच जातीभेद केला नाही उलट सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन रयतेच स्वराज्य स्थापन केल अशा सर्व समावेशक शिवाजी महाराज यांच्या बद्दल असे वादग्रस्त वक्तव्य करून विकृत विचारसरणीचे लोक बहुजनांच्या भावना दुखावण्याचा प्रकार करत आहेत
                           अश्या विकृती ला सरकारने महाराष्ट्रा मध्ये फिरणे बंद करून कठोर कारवाई करावी, सरकारने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करावी , बहुजनांच्या महापुरूषांच्या बदनामी करणार्या आशा विकृत लोकांवर  ताबडतोब कारवाई करावी ,अन्यथा संभाजी ब्रिगेड  व तमाम शिवप्रेमी संघटना  तीव्र आंदोलन करतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान झाल्यास त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील.
       याप्रसंगी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवश्री मच्छिंद्र गुंड, आप्पासाहेब मकासरे, संजय संसारे, सुरेश पाटील लांबे धनंजय गाडे, किरण आहेर, करण मुसमाडे, शाहरूख शेख, आप्पासाहेब खामकर     प्रल्हाद  ससाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
17 − 15 =