घर ठळक बातम्या व्हिडीओ: कोल्हार येथे स्वामिल ला लागली भीषण आग

व्हिडीओ: कोल्हार येथे स्वामिल ला लागली भीषण आग

198
0

कोल्हार : राहता तालुक्यातील कोल्हार येथे लोणी रोड ला आंबेडकर कॉलेज समोरील स्वामिल ला रात्री 9.30च्या सुमारास अचानक गजानन स्वमिल,(मालक पोखर ) ला आग लागली.
रात्री 9.30च्या सुमारास एम.एस.ई.बी.च्या लाइट ने बंद होण्याचा झटका मारला त्याच दरम्यान या गजानन स्वमिल ला आग लागली असता रमजान महिना चालू असल्याने बहुसंख्य मुस्लिम तरुण नमाजहून जात अस्ताना त्या कडे धाव घेतली व आग विझवण्यात दंग झाले.

प्रवरा चे अग्नीशामक,राहाता नगरपरिषदेचे अग्नीशामक, देवालाळी प्रवरा चेअग्नीशामक,
राहूरीनगरपरिषदेचे अग्नीशामक, संगमनेरनगरपरिषदेचे अग्नीशामक,श्रीरामपूर नगरपरिषदेचे चे अग्नीशामक या सर्व अग्नीशामकांच्या जवळ जवळ तीन तीन वेळा पाणी आणणे व मारणे अशा फेर्या झाल्या.रात्री12वाजे पर्यंत आग विझविण्यात पुर्ण यश आले.
गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आग विझविन्यात सहभाग घेतला होता.
या भीषण आगी मुळे गजानन स्वामील चे मालक पोखर परिवार भयभीत झाले असून या आगी मध्ये लाखो रुपये चे नुकसान झाले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे
आगीमुळे कोल्हार परिसरात धुरामुळे धुरकट परिस्तिथी निर्माण झाली होती.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
22 − 13 =