घर जिज्ञासा कपडे घाला …आपल्या देहयष्टीनुसार

कपडे घाला …आपल्या देहयष्टीनुसार

105
0

उत्तम ड्रेस आपल्या नेहमी टवटवीत ठेवतो. त्यामुळे आपल्यात नेहमी जोम, उत्साह व आत्मविश्‍वास सळसळत राहातो. इंटरव्ह्यू द्यायचा असो वा एखाद्या मीटिंगमध्ये वा महत्त्वाच्या कामात यश मिळवायचे असो, त्यासाठी आपल्या पूर्वतयारी करावी लागते. उदा. पॉइंटस तयार करणे, सर्व माहिती गोळा करणे, इ. या सर्वांबरोबरच आपला ड्रेस सेन्सही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. खरे तर कोणत्याही क्षेत्रात कामाच्या सातत्याने व जिद्दीने यश मिळत असते; पण उत्तम, आकर्षक कपड्यांची निवड आपले फर्स्ट इंप्रेशन बळकट करतेच शिवाय आपले पॉझिटिव्ह थिंकिंगही वाढवते. फयत महागडे कपडे घालून कोणी आकर्षक होऊ शकत नाही. यामुळेही ड्रेस सेन्सचे महत्त्व वाढतो. कारण कपडे निवडण्यापूर्वी शारीरिक ठेवण, उंची लक्षात घेण्याची गरज असते. कोणीही तरुणतरुणी कितीही सुंदर असली, तरी जर आपल्या देहयष्टीनुसार ड्रेस घातला नाही, तर ती आकर्षक दिसत नाही. यासाठी आपल्या ड्रेसचे डिझाइन, कट व स्टाइल आपले व्ययितमत्व उजळले अशीच हवी.
सही म्हणजेच योग्य ड्रेससेन्स आपल्या व्ययितमत्त्वाला एक आकर्षक ओळख देतो. त्यामुळे आपण इंटरव्ह्यू, पार्टी, फंयशन, मीटिंग, शाळा, कॉलेज व ऑफिसात आपल्या आकर्षणाची छाप पाडू शकता. कपडे घालताना त्यांना स्टाइल देण्याचा सेन्स असणे अत्यंत गरजेचे असते. तसा ड्रेस सेन्स कोणत्याही वयात हवा; पण यंग जनरेशनसाठी तो जास्तच महत्त्वाचा असतो, कारण कपडे व्ययितमत्त्व उजळताना आपल्यामध्ये आत्मविश्‍वासही वाढवतात. म्हणूनच कपड्यांची निवड पूर्ण विचारांतीच करायला हवी. कारण हीच्या व्यावसायिक युगात आपल्याविषयी कोणताही समज आपल्या आउटफिटवरूनच होत असतो. स्लिम-ट्रिम तरुण-तरुणींना सारे काही शोभून दिसतेे; पण स्थूल व्ययतींनी टी शर्ट वा हेवी वर्कचे कपडे टाळावेत. हाफ स्ट्राइप्सचे आस्टोकट घातल्यामुळे आपली हाइटही चांगली दिसेल व स्लिमर लुकही मिळेल. राजस्थानी स्कर्ट कुर्ता वा टॉपसोबत घालावा. जर वेस्टर्न ड्रेस पसंत असेल, तर पाँचो व कुर्ता जीन्स व स्लीम ड्राउझरसोबत घालू शकता. कपडे खरेदी करताना रंगांबाबतही खास लक्ष द्यावे. ही, गुलाबी, वॉटरमेलन, नारंगी, मेटॅलिक गोल्ड, लाल आयव्हरी फ्यूशिया व टरक्वाय कलर्स बरेच फॅशनमध्ये आहेत. कपड्यांची निवड करताना हाइटही लक्षात घ्यावी. जर हाइट कमी असेल व उंच दिसू इच्छित असाल, तर एकाच रंगाचा ड्रेस करावा.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
10 × 27 =