घर ठळक बातम्या गिरीश महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांची तुफान मारहाण

गिरीश महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांची तुफान मारहाण

150
0

जळगाव: अमळनेर येथे बुधवारी संध्याकाळी ५:३० वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर धक्काबुक्की तर माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांना मारहाण करण्यात आली.

पालकमंत्री गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जळगावमधील भाजपच्या सभेत हा राडा झाला. गिरीश महाजन यांनाही खाली खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, गिरीश महाजन यांनी काही कार्यकर्त्यांना ढकलून दिलं. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला.

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जळगाव येथील सभेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
34 ⁄ 17 =