घर राष्ट्रीय पाकला उत्तर देण्यासाठी भारताने तैनात केली होती अण्वस्त्र सज्ज INS अरिहंत पाणबुडी

पाकला उत्तर देण्यासाठी भारताने तैनात केली होती अण्वस्त्र सज्ज INS अरिहंत पाणबुडी

70
0

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सर्वोच्च पातळीवर असताना भारतीय नौदलाने आपली अण्वस्त्र सज्ज आयएनएस अरिहंत पाणबुडी तैनात केली होती. युद्ध रणनितीसंदर्भात नौदलाकडून माहिती देण्याची ही दुर्मिळ बाब आहे. पुलवामा हल्ल्याच्यावेळी भारतीय नौदलाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु होता. परिस्थिती बदलताच भारतीय नौदल लगेचच पाकिस्तानी नौसेनेला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढताच आयएनएस विक्रमादित्य, अण्वस्त्र सज्ज पाणबुडया, अन्य युद्धजहाजे, विनाशिका आणि फायटर विमाने अत्यंत जलदगतीने युद्ध अभ्यासातून बाहेर पडून प्रत्यक्ष शत्रूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या असे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले.

भारतीय नौदलाची ६० जहाजे, तटरक्षक दलाची १२ जहाजे आणि ६० विमानांचा ट्रॉपेक्स युद्ध अभ्यास सुरु होता. त्यावेळी तात्काळ या सर्व ताफ्याची अरबी समुद्रात तैनाती करण्यात आली होती. भारतीय नौदलाच्या या वेगवान हालचालीमुळेच पाकिस्तानी नौदलाच्या माकरान किनारपट्टीपर्यंतच हालचाली मर्यादीत राहिल्या. ते खुल्या समुद्रात येऊ शकले नाहीत असे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले. आयएनएस अरिहंत ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. अरिहंतच्या समावेशामुळे भारताला जमीन, आकाश आणि समुद्रातून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. क्रू ची सर्व व्यवस्था केल्यानंतर अरिंहतमध्ये अनेक महिने पाण्याखाली राहण्याची क्षमता आहे.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
4 × 9 =